‘बिग बॉस मराठी 6’मधून या सर्वाधिक चर्चेतल्या स्पर्धकाचा पत्ता कट; मोठी संधी हुकली

'बिग बॉस मराठी 6'ची ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. या शोच्या बाराव्या आठवड्यात आणखी एका स्पर्धकाला घराबाहेर पडावं लागलं आहे. हा स्पर्धक कोण आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Apr 05, 2026 | 11:58 AM
1 / 5
'बिग बॉस मराठी 6' हा शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचत असून घरात आता फक्त आठ स्पर्धक उरले आहेत. या आठपैकी एकाचा प्रवास आज (रविवारी) संपणार आहे. टॉप 7 स्पर्धकांमध्ये कोणाला समाविष्ट होता येणार नाही, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

2 / 5
बिग बॉसच्या घरात सध्या तन्वी कोलते, दिपाली सय्यद, राकेश बापट, राखी सावंत, सागर कारंडे, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि रेवा कौरासे हे स्पर्धक राहिले आहेत. यापैकी एकाला आज घराबाहेर पडावं लागणार आहे. या स्पर्धकाच्या नावाची घोषणा रितेश देशमुख 'भाऊचा धक्का' एपिसोडमध्ये करणार आहे.

3 / 5
बाराव्या आठवड्यातील एलिमिनेशनसाठी घरातील सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यापैकी विनोदवीर सागर कारंडेला घराबाहेर जावं लागल्याचं कळतंय. सागर पहिल्या एपिसोडपासून सोशल मीडियावर त्याच्या खेळीमुळे चर्चेत राहिला. अनेकांनी त्याच्यावर 'डबल ढोलकी'ची टीका केली होती.

4 / 5
सागर कारंडेची बिग बॉसच्या घरातील दुटप्पी वागणूक प्रेक्षकांना खटकत होती. स्पर्धकांच्या तोंडावर गोड बोलून त्यांच्याच पाठीमागे तो टीका करायचा. त्यामुळे त्याचा हा स्वभाव अनेकांना आवडला नव्हता. अखेर या आठवड्यात सर्वांत कमी मतं मिळाल्याने सागरला घराबाहेर पडावं लागल्याचं समजतंय.

5 / 5
भाऊच्या धक्क्यावर सूत्रसंचालक रितेश देशमुखने विशाल कोटियनची चांगलीच शाळा घेतली. विशालने राकेशच्या खासजी आयुष्याबाबत टिप्पणी केली होती. तुझा घटस्फोट का झाला, तुझे किती अफेअर्स होते, हे मी सर्वांना सांगतो.. अशी धमकी त्याने राकेशला दिली होती.

Follow Us