कशा परिस्थितीत आहे सलमान खानची पहिली अभिनेत्री? वयाच्या 57 व्या वर्षी जगतेय असं आयुष्य

अभिनेता सलमान खान याच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी स्क्रिन शेअर केली आहे. आज देखील सलमान खान अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये संधी देतो... पण सलमान खान याच्या पहिल्या अभिनेत्रीबद्दल फार कोणाला माहिती नसेल. अभिनेत्री आज वयाच्या 57 व्या वर्षी कसं आयुष्य जगतेय घ्या जाणून...

| Updated on: Feb 23, 2026 | 2:55 PM
1 / 5
1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्रीने महत्त्वाची भूमिका साकरात चाहत्यांचं मनोरंजन केलं.  सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास 37 वर्ष झाली आहेत, पण भाग्यश्री बिलकून बदलली नाही. आजही अभिनेत्री  तितकीच सुंदर दिसते.

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्रीने महत्त्वाची भूमिका साकरात चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास 37 वर्ष झाली आहेत, पण भाग्यश्री बिलकून बदलली नाही. आजही अभिनेत्री तितकीच सुंदर दिसते.

2 / 5

अभिनेत्री भाग्यश्री हिचा जन्म 23 फेब्रुवारी 1969 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे विजय सिंगराव माधवराव पटवर्धन आणि राजलक्ष्मी पटवर्धन यांच्या घरी झाला. अभिनेत्री आज तिचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे.

3 / 5

भाग्यश्रीने 37 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी अभिनेत्री हिमालय दासानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याच वर्षी तिने त्याच्याशी लग्न केलं आणि हळूहळू अभिनेत्री बॉलिवूड जगतापासून दूर राहू लागली.

4 / 5

भाग्यश्री आणि हिमालय यांना लग्नानंतर दोन मुले झाली. या जोडप्याला एक मुलगी, अवंतिका दसानी आणि एक मुलगा, अभिमन्यू दसानी आहे. त्यांच्या आईप्रमाणेच, दोघांनीही अभिनय क्षेत्रात काम केलं आहे.

5 / 5

आता भाग्यश्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर अभिनेत्रीचे 26 लाखांपेक्षा देखील अधिक फॉलोअर्स आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us