Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

Sanchita Ugale: छावा सिनेमातील अभिनेत्री संचिता उगलेने मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. आता तिच्या जवळच्या मैत्रिणीने धक्कादायक खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

| Updated on: Jun 15, 2026 | 4:51 PM
1 / 6
टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, संचिताच्या जवळची मैत्रिण मेघा शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. संचितासोबत नेमकं काय घडलं? हे तिने सांगितले आहे.

2 / 6

संचिता गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनशी झुंज देत होती आणि वारंवार आत्महत्या करण्याविषयी बोलत होती असे मेघाने सांगितले. एका जुन्या मुलाखतीत संचिताने इंडस्ट्रीत आल्यानंतरच्या आपल्या संघर्षाबद्दलही सांगितले.

3 / 6

२२ वर्षीय संचिता उगले टीव्ही शोद्वारे लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करत होती. अनेक लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने सर्वजण सुन्न झाले आहेत. त्यांचे कुटुंब, मित्र-मैत्रिणी सर्वजण गहिर्या शोकात आहेत.

4 / 6

संचिता यांच्या मित्रिणी मेघा शर्मा यांनी ‘मनीकंट्रोल’शी बोलताना सांगितले, “मी मोठ्या धक्क्यात आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत. मी ऐकले की, तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.”

5 / 6

पुढे तिने सांगितले की, संचिताला काही आरोग्य समस्या होत्या आणि वैयक्तिक कारणांमुळे जानेवारीपासून ती डिप्रेशनमुळे त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते. “ती एक हसतमुख आणि बेफिकीर व्यक्ती होती. मी तिला 10 दिवसांपूर्वी भेटले होते आणि तिला ऑडिशनसाठी घेऊन गेले होते. तिला पूर्ण विश्वास होता की ती निवडली जाईल. पण नंतर तिचा फोन बंद झाला” असे मेधा म्हणाली.

6 / 6

मेघा यांनी आणखी एक मोठा खुलासा केला की, संचिता वारंवार म्हणायची की “मी माझा जीव जाईल आणि आम्ही सर्वजण, तिची आई व संपूर्ण कुटुंब तिला सकारात्मक राहण्यासाठी समजावत असे. पण यावेळी आम्ही तिला वाचवू शकलो नाही. ती स्वतःवर खूप प्रेम करत होती.”

Follow Us