क्रिकेटर शुभमन गिलची नातेवाईक आहे शहनाज? कनेक्शनवर सोडलं मौन

'बिग बॉस' फेम अभिनेत्री शहनाज गिलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभमन गिलसोबतच्या कनेक्शनविषयी मौन सोडलं आहे. शुभमनशी तुझं काही कनेक्शन आहे का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

| Updated on: Nov 11, 2025 | 3:32 PM
1 / 5
अभिनेत्री शहनाज गिल आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे दोघांचं आडनाव. गिल हे एकच आडनाव असल्याने हे दोघं नातेवाईक आहेत की काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. अखेर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शहनाजने यावर मौन सोडलं आहे.

2 / 5
पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत शहनाजला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तू आणि शुभमन गिल लांबचे नातेवाईक तर नाही ना, असा प्रश्न रणवीरने शहनाजला विचारला. हा प्रश्न ऐकून आधी शहनाज जोरात हसली.

3 / 5
शहनाज रणवीरला म्हणाली, "मला हे खूपच आवडलंय. तोसुद्धा (शुभमन) तिथलाच आहे. असेल कदाचित माझा दूरचा भाऊ किंवा चुलत भाऊ. तोसुद्धा आमच्या अमृतसरचाच आहे. जेव्हा तो सोशल मीडियावर ट्रेंड होतो, तेव्हा मधे मध्ये मीसुद्धा ट्रेंड होऊ लागते."

4 / 5
"भाऊ-बहीण म्हणून काहीतरी कनेक्शन असेलच", असं ती पुढे म्हणते. त्यानंतर तिला विचारलं जातं की, तू तुझ्या नातेवाईकांना कधी विचारलंस का की, त्यापैकी कोणी भारतीय क्रिकेट टीमच्या कॅप्टनशी संबंधित आहेत का म्हणून?

5 / 5
तेव्हा शहनाज नकारार्थी उत्तर देते. "मी स्वत:लाच हा प्रश्न विचारला आहे. तेव्हा मला उत्तर मिळालं की, कदाचित आमचं भावा-बहिणीचं काहीतरी कनेक्शन असेल. शुभमन खूपच प्रेमळ आहे. तो खूप चांगला खेळतो. पण मला विराट कोहलीसुद्धा खूप आवडतो. विराटमुळे मी क्रिकेट बघू लागले", असं शहनाज सांगते.