लग्नानंतर शिखर धवन याचे बायकोसोबत खास क्षण व्हायरल, फोटो पाहून म्हणाल…
माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन सध्या आपल्या पत्नीसोबत हनिमूनचा आनंद घेत आहे. त्याची पत्नी सोफी शाइनने या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दोघांचे फोटो व्हायरल होत आहे. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केलं.

माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. शिखरने नुकतेच गर्लफ्रेंड सोफी शाइन हिच्याशी दुसरे लग्न केले आहे. सध्या दोघे एकमेकांसोबत आनंदी क्षण व्यतीत करत आहेत.

सोफी शाइनने शिखर धवनसोबतच्या हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही बालीमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहेत. चाहत्यांची देखील दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. दोघांची जोडी चाहत्यांना आवडली देखील.

सोफीने आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिने मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली आहे. लग्नानंतर ती भारतात राहत असून शिखर धवनसोबत व्यावसायिकरित्या काम करत आहे. तसेच ती 'द वन स्पोर्ट्स'मध्ये चीफ ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून काम करत आहे.

शिखर धवन आणि सोफी शाइन यांची पहिली भेट दुबईमध्ये झाली. 2024 साली ते दोघे एकत्र दिसले होते. त्यानंतर 2025 मध्ये त्यांच्या नात्याला दुजोरा मिळाला. जानेवारी 2026 मध्ये दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी लग्न केले.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी 2026 गर्लफ्रेंड सोफी शाईन हिच्यासोबत शिखरने लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.