Shubman Gill: विराटचा मुलगा अकायबद्दल गिलची भन्नाट कमेंट, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

Shubman Gill Comment On Akaay Kohli: कर्णधार शुभमन गिलने नुकतीच एक कमेंट केली आहे. या कमेंटची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

| Updated on: Sep 04, 2026 | 11:34 AM
1 / 5
विराट कोहली आणि शुभमन गिल हे किती चांगले मित्र आहेत हे सगळ्यांच माहित आहे. क्रिझपासून ते पर्सनल आयुष्यातबद्दल ते एकमेकांशी अनेक गोष्टींवर चर्चा करतात.

विराट कोहली आणि शुभमन गिल हे किती चांगले मित्र आहेत हे सगळ्यांच माहित आहे. क्रिझपासून ते पर्सनल आयुष्यातबद्दल ते एकमेकांशी अनेक गोष्टींवर चर्चा करतात.

2 / 5

सध्या शुभमन गिल आणि विराट कोहलीचा मुलगा अकाय कोहली चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर एक मजेशीर इंस्टाग्राम रील व्हायरल होत आहे.

3 / 5

ज्यामध्ये एक कंटेंट क्रिएटर विराट कोहलीचा मुलगा अकायच्या शाळेतील शिक्षकाची भूमिका साकारताना दिसत आहे. या रीलमध्ये, शिक्षक गंमतीने अकायला एका चुकीबद्दल त्याचे आई-वडील, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना शाळेत बोलावण्यास सांगतात. पण रीलमधील ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा तो क्रिएटर लाजत लाजत मुलाला त्याचा काका, शुभमन गिल याला सोबत आणायला सांगतो.

4 / 5

या व्हायरल रीलवर शुभमन गिललाही हसू आवरता आले नाही आणि त्याने थेट रीलखाली विराट कोहलीला टॅग करून कमेंट केली. गिलने लिहिले, "भाई, काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईन." गिलच्या या उत्तराने इंटरनेटवर खळबळ उडाली.

5 / 5

विराट कोहली आणि शुभमन गिल २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एकत्र मैदानात उतरतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us