आज माझी ती इच्छा पूर्ण झाली..; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी भावूक पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ जाधवने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये तो दगडू विचारेच्या भूमिकेत आहेत. सेटवरील काही फोटोसुद्धा त्याने शेअर केले आहेत.

| Updated on: Apr 17, 2026 | 3:30 PM
1 / 5
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यानिमित्त त्याने सोशल मीडियावर नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यानिमित्त त्याने सोशल मीडियावर नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

2 / 5

'नागराज मंजुळे भावा.. तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येक नटाची असते. आज 'मटका किंग'च्या निमित्ताने माझी ती इच्छा पूर्ण झाली. माझ्या आयुष्यातली पहिली वेब सीरिज ती ही तुझ्या दिग्दर्शनाखाली..'दगडू विचारे' नावाचं पात्र तू मला साकारायला दिलंस, माझ्यावर विश्वास टाकलास..,' अशा शब्दांत सिद्धार्थ व्यक्त झाला.

3 / 5

या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, 'ॲमेझॉन प्राइमसारखा प्लॅटफॉर्म सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर सर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर, किशोर कदम सर अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली.'

4 / 5

'नटाला प्रत्येक वेळेला चांगलं काम करायची संधी हवी असते आणि कुणीतरी तो विश्वास टाकावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून तूच लिहिलेला डायलॉग तुलाच सारखा सारखा ऐकवतो. “शुक्रिया सेठ ....काम देने के लिए नही...भरोसा रखने के लिये- आपला सिद्धू,' असं सिद्धार्थ जाधवने म्हटलंय.

5 / 5

मटका किंग ही वेब सीरिज जुगाराचा बादशहा रतन खत्रीवर आधारित आहे. यामध्ये विजय वर्मा, गुलशन ग्रोवर, कृतिका कामरा आणि सई ताम्हणकर यांच्या भूमिका आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us