तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे का? वेळीच कसे ओळखाल?

तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे का? सततची भांडणे, आर्थिक नुकसान आणि आजारपण ही त्याची लक्षणे असू शकतात. नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी वास्तू उपाय या बातमीतून जाणून घ्या.

| Updated on: Apr 03, 2026 | 3:43 PM
1 / 8
आपण अनेकदा म्हणतो की खूप कष्ट करूनही घरात सुख-संपत्ती नांदत नाही. घरातील वातावरण सतत तणावपूर्ण असते किंवा काही केल्या मन प्रसन्न राहत नाही.  वास्तूशास्त्रानुसार या सर्व गोष्टींमागे नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) कारणीभूत असते.

आपण अनेकदा म्हणतो की खूप कष्ट करूनही घरात सुख-संपत्ती नांदत नाही. घरातील वातावरण सतत तणावपूर्ण असते किंवा काही केल्या मन प्रसन्न राहत नाही. वास्तूशास्त्रानुसार या सर्व गोष्टींमागे नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) कारणीभूत असते.

2 / 8

घराची रचना आणि तिथल्या वस्तूंचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. तुमच्या घरातही अशाप्रकारे कोणती नकारात्मक ऊर्जा आहे का आणि ते कसे ओळखावे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

3 / 8

जर घरातील सदस्यांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून टोकाचे वाद होत असतील आणि कोणाचेही कोणाशी पटत नसेल, तर हे घरातील दूषित ऊर्जेचे पहिले लक्षण मानले जाते कुटुंबातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल आणि औषधोपचार करूनही गुण येत नसेल, तर घराच्या ऊर्जेची तपासणी करणे आवश्यक आहे.

4 / 8

हाताशी आलेले काम अचानक बिघडणे किंवा पैशांची सारखी चणचण भासणे हे नकारात्मक ऊर्जेचे संकेत आहेत. पुरेशी विश्रांती घेऊनही थकवा जाणवणे किंवा रात्री सतत भीतीदायक स्वप्ने पडणे हे घरातील नकारात्मकतेचे लक्षण असू शकते.

5 / 8

जर घरातील तुळस किंवा इतर शोभेची झाडे वारंवार सुकत असतील, तर समजावे की घरातील वातावरण दूषित आहे. वास्तू तज्ज्ञांच्या मते, काही साध्या बदलांनी आपण घरातील ही ऊर्जा बदलू शकतो.

6 / 8

रोज सकाळी घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकल्यास घरातील नकारात्मकता शोषली जाते. संध्याकाळच्या वेळी भीमसेनी कापूर घरभर दाखवावा. यामुळे वातावरणात सकारात्मकता पसरते.

7 / 8

घरातील तुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे आणि जुनी अडगळ त्वरित काढून टाकावी. ही ठिकाणे नकारात्मक ऊर्जेची केंद्रे असतात. सकाळी थोडा वेळ घरात गायत्री मंत्र किंवा एखादे शांत संगीत लावल्याने लहरींद्वारे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

8 / 8

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us