Dussehra : ‘या’ सुंदर पण सोप्या रांगोळ्यांशिवाय दसरा अपूर्ण, वाढेल दाराची शोभा

हिंदू धर्मात या दिवसाला फार महत्त्व आहे. या दिवशी शमीच्या झाडाची आणि आपट्याच्या पानांची पूजा केली जाती. असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला जो सण साजरा केला जाचो त्यास विजयादशमी असं देखील म्हणतात. तर अनेक महिला दसऱ्याच्या दिवशी दारात रांगोळी देखील काढतात...तर या रांगोळ्या काढल्यानंतर तुमच्याही दाराची शोभा वाढेल...

| Updated on: Oct 17, 2026 | 3:48 PM
1 / 5
नवरात्री सुरु असल्यामुळे प्रत्येक जण दसऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दसरा सणाचं महत्त्व फार मोठं आहे. भारतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे.

नवरात्री सुरु असल्यामुळे प्रत्येक जण दसऱ्याच्या प्रतिक्षेत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दसरा सणाचं महत्त्व फार मोठं आहे. भारतात दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे.

2 / 5

या मोठ्या सणाच्या दिवशी अनेक जण दारात रांगोळी काढतात... यंदाच्या वर्षी तुम्हीही आकर्षक रांगोळ्यांनी दाराची शोभा वाढवा. 'या' सोप्या आणि साध्या रांगोळ्या काढून या वर्षी दसरा साजरा करा.

3 / 5

काहींना रांगोळ्या काढायला जमत नाहीत. त्यामुळे या सोप्या आणि साध्या रांगोळ्या काढणं योग्य ठरतं. पण दसऱ्या दिवशी रांगोळीमध्ये लाल, हिरवा आणि पिवळा रंग असणं महत्त्वाचं असतं... असं देखील म्हणतात.

4 / 5

अनेक महिला नोकरी किंवा स्वतःच्या व्यवसाय करतात. म्हणून काम सांभाळून तयारी करण्यात महिलांना प्रचंड त्रास होतो. अशात इंटरनेट आणि सोशल मीडियावर देखील रांगोळ्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

5 / 5

दारासमोर रांगोळी काढल्यामुळे मन देखील प्रसन्न राहतं. अनेकांना रांगोळी काढायला प्रचंड आवडते. त्यामुळे रांगोळ्या शोधल्या जातात. अशा काही रांगोळ्या ज्या अगदी साध्या आहेत आणि काढण्यासाठी अधिक वेळ देखील लागत नाही. त्यामुळे तुम्ही यंदाच्या वर्षी आकर्षक रांगोळ्या काढू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us