Photo : आरारारा… लैच भारी ! सासऱ्याची कमाल, जावयाची धमाल… पेट्रोल महागलं म्हणून जावयाला धोंडे जेवणाला सासऱ्याकडून चक्क सिंधी घोडी भेट

पेट्रोल-डिझेल महागाईचा अनोखा फटका! धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सासऱ्यांकडून जावयाला भेट म्हणून दिली सिंधी घोडी.

| Updated on: May 27, 2026 | 5:50 PM
1 / 5
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एक अनोखी आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आणि सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे एका सासऱ्याने आपल्या जावयासाठी हटके शक्कल लढवत चक्क सिंधी जातीची घोडी भेट दिली आहे. या अनोख्या भेटीची सध्या परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

2 / 5
अधिक महिन्यात जावयाला ‘धोंडे जेवण’ देण्याची परंपरा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात पाळली जाते. या वेळी जावयाला सोन्याची अंगठी किंवा इतर मौल्यवान भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भूम तालुक्यातील इट गावातील विलास झांबरे यांनी वेगळीच कल्पना राबवली.

3 / 5
त्यांनी आपल्या जावई क्रांतीसिंह राऊत यांना धोंडे जेवणानिमित्त चक्क सिंधी जातीची घोडी भेट दिली. विशेष म्हणजे, सासऱ्यांनी जावयाला कोणतीही पूर्वकल्पना न देता तुमच्यासाठी शेती उपयोगी पार्सल पाठवलं आहे, ते धोंडे जेवणाची भेट म्हणून स्वीकारा असा निरोप दिला होता.

4 / 5
जेव्हा प्रत्यक्षात जावई क्रांतीसिंह राऊत यांनी ते पाहिले, तेव्हा त्यांना सुंदर सिंधी जातीची घोडी पाहून आनंदाचा धक्का बसला. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अशी भेट मिळेल याची कल्पनाही नव्हती. घोडी अतिशय सुंदर असून शेतीसाठी आणि वैयक्तिक आवडीसाठीही ती उपयुक्त ठरणार आहे असं ते म्हणाले.

5 / 5
सध्या पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि सोन्याचे गगनाला भिडलेले भाव सर्वसामान्यांना चिंतेत टाकत आहेत. अशा परिस्थितीत सासऱ्यांनी जावयासाठी लढवलेली ही भन्नाट शक्कल सोशल मीडियावर आणि परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us