Donkey Milk Soap : गाढविणीच्या दुधाचा अजब साबण, जगभरात वाढली मागणी, शरीराला चमत्कारिक फायदे!

सध्या दुबईतील एक साबण चांगलाच चर्चेत आला आहे. हा साबण चक्क गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलाय. विशेष म्हणजे जगातील अनेक देशांत या साबणाची मागणी वाढली आहे.

| Updated on: Nov 09, 2025 | 9:12 PM
1 / 5
सध्या गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला साबण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे लोक हा साबण आवडीने खरेदी करून वापरत आहेत. अगदी कमी काळात हा साबण प्रसिद्ध झाला आहे.

सध्या गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला साबण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे लोक हा साबण आवडीने खरेदी करून वापरत आहेत. अगदी कमी काळात हा साबण प्रसिद्ध झाला आहे.

2 / 5

हा साबण वापरल्याने त्वचेमध्ये अनक चांगले बदल होत असल्याचा दावा केला जात आहे. गढविणीच्या दुधात प्रोटीण, खनिजे, अँटीऑक्सिडेंट असतोत. त्यामुळेच गाढविणीच्या दुधापासून तयार केलेला हा साबण वापरल्यास उन्हात त्वचेचे रक्षण होते असे सांगितले जात आहे.

3 / 5

विशेष म्हणजे या साबणाची किंमत 25 ते 99 दिनार म्हणजेच 600 ते 2500 रुपये आहे. तरीदेखील लोक हा साबण खरेदी करत आहेत. गाढविणीच्या एक लिटर दुधापासून 30 साबण तयार होतात.

4 / 5

‘अतान डंकी मिल्क सोप कंपनी’ या कंपनीकडून हा साबण तयार केला जात आहे. या कंपनीकडे एकूण 20 गाढविणी आहेत. गाढविणीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या या साबणाने त्वचेवरील सुरकुत्याही कमी होत असल्याचा दावा केला जातोय.

5 / 5

हा साबण फक्त दुबईच नव्हे तर यूएई, जॉर्डन, इजिप्त तसेच अन्य आखाती देशांत आवडीने वापरला जात आहे. अगोदर या साबणाची थट्टा करण्यात आली होती. आता मात्र हा साबण चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us