तुझ्या एवढी कुरुप… आज कोट्यावधींची मालकीण असेलेल्या अभिनेत्रीला ऑडिशनमध्ये नाकारलं, अखेर अभिनयातून दाखवली ओळख

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, त्यांच्या यशस्वी प्रवासामागे अनेक आव्हानं आणि स्वतःला स्वीकारण्याचा अनुभव आहे. सुरुवातीच्या काळात रंगरूपावरून झालेल्या टीकेचा सामना करत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

| Updated on: Oct 16, 2026 | 6:02 PM
1 / 5
सोनाली कुलकर्णी यांना पहिल्याच ऑडिशनमध्ये त्यांच्या दिसण्यावरून आणि त्वचेच्या रंगावरून टिप्पण्या ऐकाव्या लागल्या. या अनुभवामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळला. मात्र, त्यांनी या टीकेला स्वतःवर हावी होऊ न देता पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

सोनाली कुलकर्णी यांना पहिल्याच ऑडिशनमध्ये त्यांच्या दिसण्यावरून आणि त्वचेच्या रंगावरून टिप्पण्या ऐकाव्या लागल्या. या अनुभवामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळला. मात्र, त्यांनी या टीकेला स्वतःवर हावी होऊ न देता पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

2 / 5

इतरांच्या मतांमुळे स्वतःची किंमत ठरवू नये, हे सोनाली यांनी शिकून घेतलं. स्वतःमधील गुण ओळखून त्यांनी आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे पुढील प्रवासात त्यांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली.

3 / 5

सोनाली यांनी 3 दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम केलं आहे. ‘दोगी’, ‘देवराई’, ‘मिशन कश्मीर’, ‘दिल चाहता है’ आणि ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच इटालियन चित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केलं आहे.

4 / 5

‘चैत्र’ या चित्रपटातील अभिनयासाठी सोनाली कुलकर्णी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेखाने गौरवण्यात आलं. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि भूमिकांमधील वैविध्य यामुळे त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा सन्मान त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.

5 / 5

सोनाली यांचा प्रवास रंगरूपापेक्षा कौशल्य आणि मेहनत महत्त्वाची असल्याचा संदेश देतो. इतरांच्या मतांपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, हे त्यांच्या अनुभवातून दिसून येतं. त्यांच्या प्रवासातून अनेकांना स्वतःचा स्वीकार करण्याची प्रेरणा मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us