साऊथ सुपरस्टार झाला अलिबागकर; कोट्यवधींची प्रॉपर्टी खरेदी, किंमत वाचून विस्फारतील डोळे!

कन्नड अभिनेता यशसुद्धा आता अलिबागकर झाला आहे. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रॉपर्टी त्याने खरेदी केली आहे. याठिकाणी तो आलिशान घर बांधणार असल्याचं समजतंय. ही प्रॉपर्टी त्याने कुठे आणि किती कोटी रुपयांना खरेदी केली, ते जाणून घ्या..

| Updated on: Jun 07, 2026 | 8:24 AM
1 / 6
गेल्या काही वर्षांत अलिबाग हे अनेक सेलिब्रिटी, उद्योजग आणि क्रिकेटपटूंच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. अनेकांनी अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विराट कोहली, दीपिका पादुकोण, क्रिती सनॉन, अक्षय खन्ना यांच्यापाठोपाठ आता साऊथ सुपरस्टारसुद्धा अलिबागकर झाला आहे. 'केजीएफ' स्टार यशने याठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

गेल्या काही वर्षांत अलिबाग हे अनेक सेलिब्रिटी, उद्योजग आणि क्रिकेटपटूंच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. अनेकांनी अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विराट कोहली, दीपिका पादुकोण, क्रिती सनॉन, अक्षय खन्ना यांच्यापाठोपाठ आता साऊथ सुपरस्टारसुद्धा अलिबागकर झाला आहे. 'केजीएफ' स्टार यशने याठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

2 / 6

रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म 'लियासेस फोरस'ला मिळालेल्या नोंदणी कागदपत्रांनुसार यश आणि त्याची पत्नी राधिका पंडित यांनी संयुक्तपणे रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील कामठ गावातील शेतजमिनीचे दोन भूखंड तब्बल 24 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. या व्यवहाराची नोंदणी अलिबात उपनिबंधक कार्यालयात 18 मे 2026 रोजी करण्यात आली.

3 / 6

कागदपत्रांवरील माहितीनुसार ही प्रॉपर्टी किहीम बीचला लागून असलेल्या कामठ गावच्या किनारी भागात एका छोट्या बाजारपेठेच्या परिसरात आहे. या प्रॉपर्टीच्या एका बाजूला गावातील रस्ता आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. राधिका आणि यश यांनी या प्रॉपर्टीसाठी 1.44 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क, 60 हजार रुपयांचं नोंदणी शुल्क आणि 5200 रुपयांचं दस्तऐवजीकरण शुल्क भरलं आहे.

4 / 6

ही जमीन 1.3 एकर क्षेत्रात पसरलेली आहे. त्यावर आधीच एक घर बांधलेलं आहे. 'डेक्कन हेराल्ड'मधील एका वृत्तानुसार, यश आणि राधिक या जमिनीवर एक अत्यंत आलिशान घर बांधण्याचं नियोजन करत आहेत. सुट्ट्यांमधील वेळ घालवण्याच्या दृष्टीने ते इथं 'हॉलिडे होम' बनवणार आहेत. ही प्रॉपर्टी किहीम बीचजवळ असल्याने तिथून थेट समुद्रकिनाऱ्यावर जाता येतं.

5 / 6

यश आणि राधिका पंडित यांच्याकडे बंगळुरूमध्ये 6 ते 8 कोटी रुपये किमतीचं डुप्लेक्स घर आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये त्यांच्या मालकीचं एक आलिशान फार्महाऊसदेखील आहे. या दोघांकडे अत्यंत महागड्या गाड्यांचं कलेक्शनसुद्धा आहे. कन्नड सुपरस्टार यश एका चित्रपटासाठी तब्बल 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेत असल्याचं समजतंय.

6 / 6

आगामी बिग बजेट 'रामायणम' या चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी त्याने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. या चित्रपटात तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याकडे एकूण 53 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कळतंय. 'केजीएफ'च्या दोन्ही भागांमुळे त्याला देशभरात प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us