फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दुसऱ्यांदा सर्वात महागड्या ब्रिटीश खेळाडूचा विक्रम मोडला, आता कोटी मोजले गेले

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटीना यांच्यात होणार आहे. या सामन्याची चर्चा होत असताना एका महागड्या खेळाडूने लक्ष वेधून घेतलं आहे. नेमकं किती कोटी मोजले गेले ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 19, 2026 | 4:46 PM
1 / 5
लंडनमधील क्लब चेल्सीने ट्रान्सफर मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ब्रिटीश फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कराराचा मार्ग मोकळा झाला आहे. चेल्सीने एस्टन व्हिलाचा स्टार अटॅकिंग मिडफिल्डर मॉर्गन रॉजर्सला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

2 / 5
रिपोर्टनुसार, एस्टन व्हिलाने चेल्सीकडून मिळालेली 117 मिलियन पाउंडची (जवळपास 1515 कोटी) बोली मान्य केली आहे. त्यानंतर कराराची कागदपत्रं आणि अटी आता अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच हा करार पूर्णत्वास येईल. (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
या करारानुसार, मॉर्गन रॉजर्सच्या वैयक्तिक अटी निश्चित करण्यात आल्या आहे. त्यानंतर तो क्लबसोबत 2032 पर्यंत सहा वर्षांच्या करारावर सही करेल. या करारामध्ये खेळाडूच्या संमतीने आणखी 12 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा पर्यायही आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
चेल्सीच्या इतिहासातील हे सर्वात महागडी हस्तांतरण करार ठरणार आहे. यापूर्वी चेल्सीने 2023 मध्ये हा विक्रम प्रस्थापित केला होता. तेव्हा अर्जेंटीनाचा मिडफिल्डर एन्झो फर्नांडिसला बेनफिकाकडून 106 मिलियन पाउंड (जवळपात 1372 कोटी) रुपयात विकत घेतलं होतं. आता रॉजर्सच्या कराराने हा विक्रम मोडीत निघाला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
ब्रिटीश फुटबॉल इतिहासातील हा सर्वात महागडा करार असणार आहे. काही महिन्यांपूर्वी हस्तांतरण करारात मँचेस्टर सिटीने नॉटिंघम फॉरेस्टकडून इंग्लीश मिडफिल्डर एलियट अँडरसनला जवळपास 1500 कोटी करारबद्ध केलं होतं. आता हा विक्रमही मोडीत निघाला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

Follow Us