नॅशनल रेकॉर्ड करणारी भारतीय एथलीट डोपिंगमध्ये अडकली, कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी मोठा धक्का

भारतीय एथलीट केएम दीक्षाने मागच्या वर्षी डिस्टेंस रनिंग स्पर्धेत नॅशनल विक्रम मोडला होता. त्यामुळे तिचं चर्चेत आलं होतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तिच्याकडून अपेक्षाही वाढल्या होत्या. पण आता डोपिंगमध्ये अडकल्याने स्वप्न धूसर झालं आहे.

| Updated on: Jun 02, 2026 | 7:21 PM
1 / 5
भारतीय क्रीडाक्षेत्रात गेल्या काही वर्षात प्रगती होताना दिसत आहे. खेळातील वेगवेगळ्या प्रकारात नावलौकिक मिळवला जात आहे. असं असताना भारतीय क्रीडाक्षेत्रावर डोपिंगचं सावट आहे. प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता खेळाडू डोपिंगमध्ये अडकत आहे. यामुळे देशाचं नावही खराब होतं. आता या यादीत केएम दीक्षा हीचं नाव जोडलं गेलं आहे. (Photo: Instagram/Deeksha)

2 / 5

महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत धावपटू दीक्षाने नॅशनल विक्रम नोंदवला होता. पण आता ती डोपिंगच्या आरोपामुळे चर्चेत आली आहे. ट्रिब्यूनच्या एका रिपोर्टनुसार, दीक्षाला यााबाबतची माहिती दिली गेली आहे. तिच्या सँपलमध्ये प्रतिबंधित पदार्थ आढळून आला आहे. (Photo: Instagram/Deeksha)

3 / 5

रिपोर्टनुसार, मिडिल डिस्टेंस धावपटू दीक्षाच्या सँपलमध्ये स्टॅनोजोलोल आढळलं आहे. हे वर्ल्ड अँटी डोपिंग एजेंसीच्या प्रतिबंधित सब्सटांसच्या यादीत आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई होऊ शकते. (Photo: Instagram/Deeksha)

4 / 5

सध्या तरी दीक्षावर कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही. पण यात दोषी आढळली तर चार वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे तिचं ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळणं कठीण आहे. भारताचं यामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे. (Photo: Instagram/Deeksha)

5 / 5

दीक्षाने 2025मध्ये 1500 मीटर स्पर्धेत नॅशनल विक्रम प्रस्थापित केला होता. लॉस अँजेलिसमध्ये साउंड रनिंग ट्रॅक फेस्टमध्ये दीक्षाने 4:04.78 मिनिटांसह विक्रमाची नोंद केली होती. तिने हरमिलन बँसचा 4:05.39 विक्रम मोडला होता. (Photo: Instagram/Deeksha)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us