6,6,6,6,6,6,6,6,6..! टी20 क्रिकेटमध्ये किरॉन पोलार्डचा विश्वविक्रम, आता केली अशी कामगिरी

वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने टी20 क्रिकेटमध्ये एक टप्पा पार केला आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याने षटकारांचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वेस्ट इंडिजसह टी20 लीग स्पर्धेत वेगवेगळ्या संघाकडून खेळणाऱ्या किरॉन पोलार्डने षटकारांचा एक विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Jan 18, 2025 | 2:28 PM
1 / 5
किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय टी20 लीग स्पर्धेच्या सातव्या सामन्यात एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. डेझर्ट वायपर्सविरुद्धच्या सामन्यात एमआय एमिरेट्सकडून खेळताना किरॉन पोलार्डने 23 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा केल्या.

2 / 5
किरॉन पोलार्डने टी20 क्रिकेटमध्ये 3 षटकारांसह 900 हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

3 / 5
ख्रिस गेल टी20 क्रिकेटचे 463 सामने असून 455 डावात 10060 चेंडूत 1056 षटकार ठोकले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये एक हजाराहून अधिक षटकार मारणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.

4 / 5
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज किरॉन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. टी20 क्रिकेटमध्ये 690 सामने खेळलेल्या पोलार्डने 614 डावांमध्ये 8930 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 901 षटकार ठोकले. यासह टी20 क्रिकेटमध्ये 900+ षटकार मारणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

5 / 5
टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकारांच्या यादीत रोहित शर्मा आहे. आंद्रे रसेलने 727, निकोलस पूरनने 593, सी मुन्रोने 550, एडी हेल्स 534 षटकार मारले आहेत. तर रोहित शर्माने 525 षटकार मारले आहेत. आतापर्यंत 448 टी20 सामने खेळलेल्या हिटमॅनने 435 डावात फलंदाजी केली आहे. यावेळी त्याने 8778 चेंडूत 525 षटकार ठोकले. यासह टी20 क्रिकेटमध्ये 500+ षटकार मारणारा तो एकमेव भारतीय फलंदाज ठरला.