Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेसाठी भारताची जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेत पीव्ही सिंधुकडून फार अपेक्षा आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वी पीव्ही सिंधुला लय सापडली आहे. तिने जापान ओपनमध्ये जबरदस्त खेळ दाखवला आणि उपांत्य फेरीत थेट खेळणार आहे.

| Updated on: Jul 17, 2026 | 5:40 PM
1 / 5
भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुला आता लय सापडताना दिसत आहे. तिने जापान ओपनच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. एशियन गेम्स 2026 मध्ये भारताला तिच्याकडून फार अपेक्षा आहेत. (Photo: PTI)

2 / 5
जापानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधु मैदानात उतरण्यापूर्वीच तिला विजय मिळाली. त्यामुळे तिला आता उपांत्य फेरीचं थेट तिकीट मिळालं आहे. (Photo: PTI)

3 / 5
उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा सामना जापानच्या दिग्गज नोजोमी ओकुहारासोबत होणार होता. मात्र माजी वर्ल्ड चॅम्पियन ओकुहाराला दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे कोर्टावर उतरू शकली आणि रिटायर्ड हर्ट झाली. त्यामुळे सिंधुला थेट उपांत्य फेरीत जागा मिळाली. (Photo: PTI)

4 / 5
पीव्ही सिंधुने दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावलं असून जापान ओपनमधील उपांत्य फेरी खास असणार आहे. कारण 998 दिवसानंतर बीडब्ल्यूएफ 750 सुपर सीरीजच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. (Photo: PTI)

5 / 5
जापान ओपनच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधुला  तगडं आव्हान असणार आहे. पीव्ही सिंधुचा सामना माजी ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या चेन युफेई हिच्याशा होणार आहे. चेन युफेईने 2020 मध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकलं होतं. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us