Asian Games पूर्वी सात्विक-चिरागने रचला इतिहास, चायना मास्टर्स जिंकणारी पहिली भारतीय जोडी

एशियन गेम्स स्पर्धेपूर्वी भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. सात्विक-चिराग जोडीने चीच्या बॅडमिंटन कोर्टवर कमाल केली. त्यांच्या या कामगिरीमुळे एशियन्स गेम्समध्ये अपेक्षा वाढल्या आहेत.

| Updated on: Sep 07, 2026 | 3:18 PM
1 / 5
एशियन गेम्स स्पर्धा याच महिन्यात सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेटप्रेमींना सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटन कोर्टवर इतिहास रचला. चायना मास्टर्स बीडब्ल्यूएफ सुपर 750 जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. (Photo: PTI)

2 / 5

सात्विक आणि चिरागने अंतिम फेरीत चीनला पराभूत करून हे यश संपादन केलं आहे. या जोडीने 11-21, 21-13, 21-17 ने सामना जिंकला. या ऐतिहासिक विजयासह दोघांनी एशियन गेम्समध्ये आपलं गोल्ड मेडल कायम राखण्याचा दावा मजबूत केला आहे. (Photo: PTI)

3 / 5

भारताच्या या जोडीने या सामन्यात पहिला सेट गमावला होता. पण त्यावर मात करत या जोडीने पुनरागमन केलं. पुढच्या दोन्ही सेटमध्ये वर्चस्व कायम राखलं आणि विजयी पताका फडकावली. चीनच्या जोडीला पुनरागमची संधीच दिली नाही. (Photo: PTI)

4 / 5

विजयानंतर सात्विक आणि चिरागने आनंद व्यक्त केला आहे. या विजयामुळे एशियन गेम्ससाठी बुस्टर मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच काय तर पुढचा प्लानही सांगून टाकला. आम्ही घरी जाऊ आणि 10 दिवस ट्रेनिंगनंतर एशियन गेम्ससाठी रवाना होऊ. (Photo: PTI)

5 / 5

सात्विक-चिरागने सांगितलं की, 2024 मध्ये ऑलिम्पिकनंतर जेव्हा चायना मास्टर्स खेळला होता. तेव्हा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 2025 मध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. पण आता एक पाऊल पुढे जात जेतेपदावर नाव कोरलं. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us