स्टीव्ह स्मिथने शतकी खेळीसह मोडला विराट कोहलीचा विक्रम, नेमकं काय केलं ते जाणून घ्या

श्रीलंका दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधील 36 वं शतक ठोकलं. या शतकासह स्टीव्ह स्मथिने विराट कोहलीचा एक खास विक्रम मोडीत काढला आहे. काय ते जाणून घ्या..

| Updated on: Feb 08, 2025 | 5:17 PM
1 / 6
गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली होती. ही आघाडी मोडून काढताना श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथने या सामन्यातील पहिल्या डावात 239 चेंडूंचा सामना 1 षटकार आणि 9 चौकाराच्या मदतीने नाबाद 120 धावांची खेळी केली.

2 / 6
स्टीव्ह स्मिथ या शतकी खेळीसह कर्णधारांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. स्टीव्ह स्मिथने या शतकासह रन मशिन्स विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. स्टीव्ह स्मिथने विदेशात सर्वाधिक कसोटी शतकं ठोकण्याचा मानही मिळवला आहे.

3 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये विदेशात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या सक्रिय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर होता. त्याने 2011 ते 2025 या कालावधील 16 शतकं ठोकली होती. आता स्टीव्ह स्मिथने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

4 / 6
स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतकी खेळी करत 17 आकडा गाठला आहे. त्यामुळे त्याने विराट कोहलीला एका शतकाने मागे टाकलं आहे. त्याचबरोबर विदेशात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे.

5 / 6
रिकी पॉन्टिंगने विदेशात 16 शतकं ठोकली आहेत. आता स्टीव्ह स्मिथने हा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच विदेशात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

6 / 6
विदेशात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. 1989 आणि 2012 या दरम्यान त्याने कसोटी 51 शतकं ठोकली आहेत . 51 पैकी 29 शतकं ही विदेशात ठोकली आहेत. विदेशात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा मान सचिन तेंडुलकरकडे आहे.