Hockey: टीम इंडियाच्या जर्सीचा रंग पुन्हा बदलला, आता नेमकं काय झालं?

एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघ जापानला रवाना झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या जर्सीचा रंग बदलल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी जर्सीचा रंग बदलल्याने वादाला फोडणी मिळाली होती. आता नेमकं काय झालं ते समजून घेऊयात...

| Updated on: Sep 08, 2026 | 6:20 PM
1 / 5
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचं आव्हान क्रॉसओव्हर फेरीत संपुष्टात आलं. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. असं असलं तरी जर्सीच्या रंगावरून बराच वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा जर्सीचा रंग बदलला गेला आहे. (Photo: PTI)

हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचं आव्हान क्रॉसओव्हर फेरीत संपुष्टात आलं. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. असं असलं तरी जर्सीच्या रंगावरून बराच वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा जर्सीचा रंग बदलला गेला आहे. (Photo: PTI)

2 / 5

भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. हॉकी इंडियाच्या मते, एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय संघ निळ्या रंगाच्या जर्सीसह उतरणार आहे. (Photo: PTI)

3 / 5

नेदरलँड आणि बेल्जियममध्ये पार पडलेल्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाच्या जर्सीचा रंग बदलला होता. निळ्या रंगाऐवजी भगव्या रंगाची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे वाद झाला होता. (Photo: PTI)

4 / 5

टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा झाल्यानंतर हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांनी दावा केला होता की, त्यांच्या परवानगीशिवाय असं केलं होतं. याबाबत काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. (Photo: PTI)

5 / 5

हॉकी इंडियाचे कोषाध्यक्ष शेखर मनोहरने यावर प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, भारतीय ऑलिम्पिक संघाने हॉकी इंडियाला किटबाबत पसंती विचारली होती. तेव्हा त्यांनी निळ्या रंगाला प्राथमिकता दिली. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us