दोन अब्जाधीशांच्या मुली युएस ओपनमध्ये आमनेसामने, कोण ठरलं वरचढ?
युएस ओपन 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी दोन अब्जाधीशांच्या मुली आमनेसामने आल्या होत्या. या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. हा सामना कोणी जिंकला? जाणून घ्या

युएस ओपन 2026 स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व पेरीत जेसिका पेगुला आणि एमा नवारो आमनेसामने आले होते. हा सामना दोन खेळाडू नाही तर दोन अब्जाधीशांच्या मुलींमध्ये झाला होता. (Photo: Getty)
जेसिका पेगुला आणि एमा नवारो दोन्ही अमेरिकन टेनिस स्टार आहेत. दोन्ही खेळाडूंचे वडील अब्जाधीश आहे. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये झालेल्या सामन्यात त्याच खेळाडूचा विजय झाला, जिचे वडील सर्वात श्रीमंत आहेत. (Photo: Getty)
युएस ओपन 2026 च्या उपांत्यपूर्वी फेरीत जेसिका पेगुलाने एमा नवारोला 3-6, 6-4, 6-3 ने पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिचा सामना बेलारूसच्या आर्यना सबालेंका हीच्याशी होणार आहे. (Photo: Getty)
एमा नवारो हीचे वडील बेन नवारो यांच्या तुलनेत जेसिका पेगुलाचे वडील टेरी पेगुला सर्वाधिक कमाई करत आहेत. दोघंही अब्जाधीश आहेत. पण जेसिका पेगुलाच्या वडिलांची कमाई नवारोच्या तुलनेत दुप्पट आहे. (Photo: Getty)
जेसिका पेगुलाचे वडील टेरी पेगुला यांची एकूण नेटवर्थ जवळपास 884 कोटी आहे. एमा नवारोचे वडील बेन नवारोची नेटवर्थ 304 कोटी रुपये आहे. (Photo: Getty)