Mahabharat : महाभारतात कुंती बनलेली ही 21 वर्षांची मुस्लिम अभिनेत्री आता कुठे आहे?
Mahabharat : स्टार प्लसवरील 'महाभारत' शो मध्ये कुंतीच्या वेगवेगळ्या फेज दाखवण्यात आलेल्या. शो मध्ये कुंतीचा रोल साकारणार्या अभिनेत्रीपेक्षा मालिकेत युधिष्ठिर, अर्जुन, कर्णाचा रोल साकारणारे अभिनेते प्रत्यक्षात वयाने तिच्यापेक्षा मोठे होते.

वर्ष 2013 मध्ये स्टार प्लसवर पौराणिक शो 'महाभारत' सुरु झालं. एकूण 267 एपिसोड झालेल्या या शो मध्ये अनेक टॉप एक्टर्सनी एकत्र काम केलं होतं. 16 सप्टेंबर 2013 ते 16 ऑगस्ट 2014 पर्यंत ही सीरियल चालली. अभिनेत्री शफक नाजही या शो चा भाग होती. तिने कुंतीची भूमिका साकारलेली.

मुस्लिम अभिनेत्री शफक नाज महाभारतात कुंतीचा रोल साकारत होती. तेव्हा तिचं वय अवघं 21 वर्ष होतं. तिचा शो मध्ये खूप कठीण रोल होता. पांडवांची आई बनलेल्या या अभिनेत्रीला वय कमी असूनही त्या भूमिकेसाठी निवडलं होतं. ती आपल्याच मुलांपेक्षा वयाने लहान होती. शफक आता टीव्ही पासून लांब असून OTT वर दिसते.

भीमची भूमिका सौरन गुर्जरने साकारली होती. त्यावेळी शो मध्ये अभिनेत्याचं वय अवघं 29 वर्ष होतं. म्हणजे कुंतीचा रोल साकारणाऱ्या शफकपेक्षा भीम वयाने मोठा होता.

स्टार प्लसच्या महाभारतात रोहित भारद्वाजने युधिष्ठिरची भूमिका साकारली होती. त्यावेळी तो 31 वर्षांचा होता. तो अजूनही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. तो शफकपेक्षा वयाने 10 वर्षाने मोठा होता.

अहम शर्मा या शो मध्ये कर्णाच्या भूमिकेत होता. रातो-रात त्याला या रोलने ओळख मिळवून दिली. त्याचं खूप कौतुक झालं. त्यावेळी अहम शर्मा 23-24 वर्षांचा होता. वयात शफकपेक्षा मोठा होता.