Gold Silver Rate : सरकारने घेतला मोठा निर्णय, आता ज्वेलरी स्वस्त होणार?, स्टॉक्स बनले रॉकेट
एकीकडे इराण युद्धाने आर्थिक अडचणी वाढल्या असताना सोमवारी 6 एप्रिल रोजी मात्र, ज्वेलरी कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी आली. कामकाजाच्या वेळी 16 टक्क्यांपर्यंत शेअरच्या भावात वाढ झाली.कामकाजाच्या शेवटी Senco Gold चे शेअर सुमारे 11 टक्के चढून बंद झाले. ट्रेडिंग दरम्यान शेअर 15 टक्क्यांपर्यंत वाढले होते. यास सरकारचा एक महत्वाचा निर्णय कारणीभूत ठरला आहे.

या गोल्ड कंपन्यांच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीमागे केंद्र सरकारचा एक निर्णय कारणीभूत ठरला आहे. सरकारने सोने आणि चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राईज (Base Import Price) मोठी कपात केली आहे. सरकारच्या या पावलाने बुलियन मार्केट आणि ज्वेलरी स्टॉक्स संदर्भात गुंतवणूकदारांचा कल बदलला, ज्यामुळे सोमवारी बाजार उघडताच खरेदीसाठी झुंबड उडाली. सरकारच्या या निर्णयाच्या आधी MCX वर सोने आणि चांदी लाल निशानावर कामकाज करत होते. इम्पोर्ट प्राईस घटल्याच्या बातमीने रेट 2 टक्क्यांपर्यंत वाढले.

सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेज एण्ड कस्टम्स (CBIC) च्या अधिसूचनेच्या नुसार सोन्याच्या बेस इम्पोर्ट प्राईसला $1,652 ने घटवून $1,526 प्रति दहा ग्रॅम करण्यात आले आहे. याच प्रकारचे चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राईसमध्येही मोठी कपात केली आहे. सरकारने चांदीचा बेस इम्पोर्ट प्राईज घटवून 2,427 डॉलर प्रती किलो (सुमारे 2,26,096 रुपये) केला आहे, जो आधी 2,820 डॉलर होता.

भारतात सोने-चांदीच्यावर लावण्यात येणारी कस्टम ड्युटी याच बेस प्राईज आधारे निश्चित होते. यासाठी या कपातीचा अर्थ आता ज्वेलर्ससाठी कच्चा माल आयात करणे आता पहिल्या पेक्षा खूपच स्वस्त होणार आहे.

ज्वेलरी स्टॉक्सचे बोलायचे झाले तर Senco Gold के शेअरमध्ये सर्वाधिक उसळी आली. तर कल्याण ज्वेसर्स (Kalyan Jewellers) चे शेअर देखील 6.57 टक्के चढून 420.35 वर बंद झाले. याशिवाय टायटन कंपनी, पीएन गाडगीळ आणि टीबीझेट(TBZ)च्या शेअर्समध्ये देखील 4 टक्के वाढ नोंदली गेली. ज्यामुळे संपूर्ण सेक्टर हिरव्या निशानमध्ये चमकू लागले.

याच दरम्यान एक्सपर्ट्स मानले तर आयात किंमतीत कपात झाल्याने ज्वेलरी कंपन्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये सुधार होणार आहे. जेव्हा कच्चा मालाचा खर्च कमी होतो, तेव्हा कंपन्या त्यांचा नफा वाढवू शकतात किंवा ग्राहकांना चांगली किंमती ऑफर करु शकतात. नव्या आर्थिक वर्ष (FY 2026-27) सुरुवातीला धोरणात्मक बदल कंपन्यांच्या बॅलन्सशिटसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.

भारतात आता लग्नसराई आणि सणांचा सिझन सुरु होणार आहे. सोन्या-चांदीच्या किंमतील घसरणीमुळे रिटेल ग्राहकांकडून मागणी वाढण्याची आशा आहे. गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक दरवाढीमुळे ग्राहक सोने खरेदी पासून दूर गेले होते. आता कमी किंमतीचा फायदा उचलण्यासाठी ग्राहक पुन्हा बाजाराकडे वळू शकतात.

एकीकडे जेथे सरकारने बेस प्राईज घटवून दिलासा दिला आहे. याशिवाय सोने-चांदीच्या तयार दागिन्यांना मागवण्यासाठी आता सरकारकडून लायसन्स घेणे अनिर्वाय करण्यात आले आहे. यामुळे घरगुती मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चालना मिळेल आणि अवैध व्यापाराला लगाम लागण्याची आशा आहे. ज्यामुळे संघटित क्षेत्रातील ज्वेलरी कंपन्यांना दीर्घ काळात मोठा फायदा मिळू शकतो.