सीलिंग फॅन की टेबल फॅन? विजेचे बिल वाचवण्यासाठी नक्की कोणता पंखा वापरावा?

उन्हाळ्यात सीलिंग फॅन की टेबल फॅन, कोणता पंखा वापरणे फायदेशीर ठरेल? वीज बचत आणि सोयीनुसार योग्य पंखा कसा निवडावा, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

| Updated on: Apr 14, 2026 | 1:48 PM
1 / 8
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उकाडा जाणवू लागला आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचीच उन्हामुळे अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. उन्हाळा वाढल्याने घराघरांत पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उकाडा जाणवू लागला आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचीच उन्हामुळे अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. उन्हाळा वाढल्याने घराघरांत पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

2 / 8

आपण अनेकदा घरात सीलिंग फॅन (छतावरील पंखा) असतानाही थंड हवेसाठी टेबल फॅन वापरतो. पण विजेची बचत करण्यासाठी सीलिंग फॅन की टेबल फॅन कोणता उत्तम यावरून ग्राहकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो. आज आपण यातील कोणता पंखा वापरावा, याची माहिती घेणार आहोत.

3 / 8

तज्ज्ञांच्या मते, विजेच्या बिलाचा विचार करता टेबल फॅन अधिक किफायतशीर ठरतात. एका आकडेवारीनुसार, सीलिंग फॅन साधारणपणे ६० ते ८० वॅट वीज वापरतात, तर टेबल फॅन केवळ ३० ते ५० वॅट वीज वापरतात. त्यामुळे, जर तुम्ही दीर्घकाळ पंखा वापरणार असाल, तर टेबल फॅनमुळे विजेचे बिल कमी राखण्यास मदत होते.

4 / 8

सीलिंग फॅन मोठ्या खोल्यांसाठी उपयुक्त ठरतात, कारण ते संपूर्ण खोलीत समान हवा पसरवतात. याउलट, टेबल फॅन हे एका विशिष्ट दिशेने हवा देण्यासाठी डिझाइन केलेले असतात. जर तुम्हाला स्वतःच्या आजूबाजूला किंवा ऑफिस डेस्कवर थंडावा हवा असेल, तर टेबल फॅन अधिक परिणामकारक ठरतो.

5 / 8

टेबल फॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो तुम्हाला कुठेही, कोणत्याही ठिकाणी वापरता येतो. हे पंखे तुम्ही स्वयंपाकघर, बाल्कनी किंवा कोणत्याही खोलीत सहज हलवू शकता.

6 / 8

याउलट, सीलिंग फॅन एकदा बसवल्यानंतर एकाच ठिकाणी स्थिर राहतात. मात्र, सीलिंग फॅनमुळे खोलीत मोकळी जागा राहते. ते दीर्घकाळ टिकणारे असतात.

7 / 8

किंमतीच्या बाबतीत टेबल फॅन स्वस्त असतात. त्यांच्यासाठी कोणत्याही इंस्टॉलेशनचा खर्च नसतो. सीलिंग फॅन खरेदी करताना आणि ते बसवताना तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते, ज्यामुळे खर्च वाढतो. सीलिंग फॅन उंचावर असल्याने त्यांची साफसफाई करणे आव्हानात्मक असते, तर टेबल फॅन सहज साफ करता येतात.

8 / 8

थोडक्यात सांगायचे तर, जर तुमची खोली मोठी असेल आणि तुम्हाला संपूर्ण खोलीसाठी थंड हवा हवी असेल, तर सीलिंग फॅनचा पर्याय उत्तम आहे. मात्र, जर तुम्हाला विजेची बचत करायची असेल आणि पोर्टेबिलिटी हवी असेल, तर टेबल फॅन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us