Sunny Deol : सनी देओलची हिरॉइन, रांगेत 20 फ्लॉप, नंतर थेट 600 कोटीचा सुपरडूपर हिट चित्रपट
Sunny Deol : सनी देओलसोबत अनेक अभिनेत्रींनी काम केलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने रांगेत 20 फ्लॉप दिले. नंतरचा चित्रपट ठरला सुपरडूपर हिट.

अमीषा पटेलने वर्ष 2000 मध्ये ऋतिक रोशनसोबत 'कहो ना... प्यार है' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. अमीषा रातोंरात स्टार बनली. त्यानंतर तेलुगु फिल्म'बद्री' आणि सनी देओलसोबत 'गदर: एक प्रेम कथा'मध्ये काम केलं.

या चित्रपटाने इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश केला. पण चांगल्या सुरुवातीनंतर हळूहळू अमीषाच्या करिअरचा वेग मंदावला. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

अमीषाच्या चित्रपटांमध्ये 'आप मुझे अच्छे लगने लगे', 'ये जिंदगी का सफर', 'आप की खातिर', 'हमको तुमसे प्यार है', 'तथास्तु', 'तीसरी आंख', 'शर्त', 'सुनो ससुरजी', 'वादा', 'एलान' आणि 'जमीर' सारख्या चित्रपटांचा समावेश होतो.

दीर्घकाळ मोठ्या पडद्यापासून लांब राहिल्यानंतर अमीषा पटेलने वर्ष 2023 मध्ये सनी देओलसोबत 'गदर 2' मधून सकीनाच्या रोलमधून कमबॅक केलं. या चित्रपटाने जगभरात 600 कोटीपेक्षा जास्तचा व्यवसाय केला. वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

अमीषा पुन्हा एकदा चर्चेत आली. 'गदर 2' च्या यशानंतर अमीषा पटेलने 'गदर 3'वर काम सुरु असल्याची पुष्टि केली आहे. नवीन सीक्वलच मोठ्या लेव्हलवर काम सुरु असल्याचं अमीषाने सांगितलं. फॅन्सना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सनी देओल आणि अमीषा पटेलच्या जोडीला पहायचं आहे.