‘तारक मेहता’चा जावई कोण? शाही लग्नात कोट्यवधींचा खर्च; व्हीआयपी पाहुण्यांची मांदियाळी

'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांची मुलगी स्वराचं उमेद भवन पॅलेसमध्ये अत्यंत शाही लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर सध्या याच विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शैलेश लोढा यांचा जावई कोण आहे, तो काय करतो, हे जाणून घ्या..

| Updated on: Jul 10, 2026 | 11:06 AM
1 / 5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अनेक वर्षे 'तारक मेहता'ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेले अभिनेते शैलेश लोढा सध्या त्यांच्या लाडक्या लेकीच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. त्यांची मुलगी स्वरा लोढाचा जोधपूरमधील उमेद पॅलेसमध्ये भव्य विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्या नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते.

2 / 5
शैलेश लोढा यांचे जावई शाश्वत हे पेशाने सिंगापूर स्थित बँकर आहेत. ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात आणि ग्लॅमरच्या विश्वापासून त्यांचा काहीच संबंध नाही. म्हणूनच पब्लिक डोमेनमध्ये त्यांच्याविषयीची फारशी माहिती उपलब्ध नाही. अभिनय क्षेत्राशी त्यांचा दूर दूरपर्यंत संबंध नाही.

3 / 5
शाश्वत आणि स्वरा हे दोघंही त्यांचं खासगी आयुष्य सोशल मीडिया आणि झगमगाटापासून दूर ठेवणंच पसंत करतात. लग्नाआधीही या दोघांचे फार कमी फोटो समोर आले होते. तर दुसरीकडे शैलेश लोढा हे टीव्ही, कविता मंचच्या विश्वातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे.

4 / 5
शैलेश लोढा यांची मुलगी स्वरा ही लेखिका आहे. तिने आई डॉ. स्वाती लोढा यांच्यासोबत मिळून '54 Reasons Why Parents Suck' या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. स्वरा ही गायिकासुद्धा आहे. युट्यूबवर तिने तिच्या बँडसोबत गायलेलं एक गाणंसुद्धा उपलब्ध आहे. मात्र लाइमलाइटपासून ती दूरच राहणं पसंत करते.

5 / 5
स्वरा आणि शाश्वत यांचा विवाहसोहळा दोन ठिकाणी पार पडला. पहिला सोहळा मुंबईतील ताज लँड्स अँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत खाजगीरित्या पर पडला. त्यानंतर राजस्थानमधील उमेद भवन पॅलेसमध्ये तीन दिवसांच्या शाही सोहळ्यात दोघांनी पुन्हा लग्नगाठ बांधली.

Follow Us