Neha Mehta : तारक मेहता फेम अंजली भाभीची सटकली, सरळ वॉर्निंग दिली, तुम्ही माझ्या नावाने..

Neha Mehta : नेहा मेहताचा पहिला चित्रपट 'तुझ मारी मौसम' होता. अनेक वर्ष तिने गुजराती थिएटरमध्ये अभिनय केला. 2001 साली टीव्ही शो 'डॉलर बहू' मधून तिने मालिकाविश्वात पाऊल ठेवलं.

| Updated on: Apr 15, 2026 | 8:20 AM
1 / 5
'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम नेहा मेहता पुन्हा एकदा टेलिविजनवर सक्रीय झाली आहे. पाच वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर नेहा मेहताने मालिका विश्वात पुनरागमन केलय. तारक मेहता शो मध्ये ती अंजली भाभीच्या रोलमुळे लोकप्रिय झाली.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम नेहा मेहता पुन्हा एकदा टेलिविजनवर सक्रीय झाली आहे. पाच वर्षाच्या मोठ्या गॅपनंतर नेहा मेहताने मालिका विश्वात पुनरागमन केलय. तारक मेहता शो मध्ये ती अंजली भाभीच्या रोलमुळे लोकप्रिय झाली.

2 / 5

आता नेहा मेहता 'इत्ती सी खुशी' मालिकेत काम करतेय. ती काठियावाडी मां हेतलच्या भूमिकेत आहे. नेहाने नुकताच एक इंटरव्यू दिला. ज्यात तिने तिच्या नावाने फेक आयडी बनवणाऱ्यांचा क्लास घेतला. तिच्या बदललेल्या लूक्सची सुद्धा चर्चा आहे.

3 / 5

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम नेहा मेहता म्हणजे अंजली भाभीने 'बजोका स्पॉटलाइट'ला इंटरव्यू दिला. त्यात तिने सांगितलं की, सोशल मीडियावर जे काही तिच्याबद्दल आहे ते तिला माहित आहे. लोक तिच्या नावाने फेक आयडी बनवून अकाऊंट चालवत आहेत. मी कारवाई करु शकते असा इशाराही तिने दिलाय.

4 / 5

टेलीविजन सीरीयलमध्ये पुन्हा काम करण्याबद्दल ती बोलली की, मी अनेक कारणांमुळे हा रोल स्वीकारला. एक म्हणजे चॅनलवर परतणं. तिथे मी काम केलय. सोबतच तो रोल खूपच इंटरेस्टिंग होता. लोक माझं कॅरेक्टर कसं स्वीकारतात याची मला उत्सुक्ता आहे.

5 / 5

नेहा मेहताकडे परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मास्टर्स डिग्री आहे. ती भरतनाट्यम शिकली आहे. ड्रामाचा डिप्लोमा सुद्धा आहे. नेहा मेहता यांचे वडिल एक लेखक आहेत. तिने हे सुद्धा सांगितलं की, ती एक इन्स्पेक्टरची मुलगी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us