
अभिनेत्री तब्बू हिल आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे... तब्बू हिने अनेक हिट सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. वयाच्या 54 व्या वर्षीही ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि विविध भूमिका साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यात तिच्या नात्याची अनेक वेळा चर्चा झाली आहे, परंतु तिने अद्याप लग्न केलेलं नाही.

सुष्मिता सेन ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सिनेमांव्यतिरिक्त, तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांमुळे चर्चेत असते, तरीही वयाची 50 वर्षे ओलांडल्यानंतरही तिने लग्न केलेलं नाही.

मनीषा कोईरालाने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचं लग्न 2010 मध्ये झालं होतं, परंतु दोन वर्षांनी घटस्फोट झाला. त्यानंतर तिने पुन्हा लग्न केलं नाही. सध्या ती 55 वर्षांची आहे आणि तिच्या आयुष्यात स्वतंत्रपणे पुढे जात आहे.

अमिषा पटेलने तिच्या करिअरची सुरुवात 'कहो ना... प्यार है' या सिनेमाने केली, जो ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमाने तिला एका रात्रीत लोकप्रियता मिळवून दिली. वयाच्या 50 व्या वर्षीही ती सिनेमांमध्ये सक्रिय आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलते, पण आजही ती अविवाहित आहे.

रेखा यांचं सौंदर्य आणि अभिनय कौशल्य आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. वयाच्या 71 व्या वर्षीही रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. रेखा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. रेखा यांनी लग्न देखील केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही, आज रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.