14 वर्षे अयशस्वी करिअर, दहावीनंतर कामाला सुरुवात.. सरवणकरांची होणारी सून तेजस्विनी लोणारी आहे तरी कोण?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. शिवसेना नेते समाधान सरवणकर यांच्याशी तिने साखरपुडा केला आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत.

Updated on: Oct 28, 2025 | 11:50 AM
1 / 5
'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस' अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नुकताच साखरपुडा केला आहे. नुकताच तेजस्विनी आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्या साखरपुडा पार पडला.

2 / 5
समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. मुंबईतील अत्यंत आलिशान हॉटेलमध्ये हा साखरपुडा पार पडला असून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींची या कार्यक्रमाला उपस्थिती पहायला मिळाली.

3 / 5
अभिनेत्रीसोबतच तेजस्विनी निर्मातीसुद्धा आहे. केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदे यांच्या 'नो प्रॉब्लेम' या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. तेव्हा नुकतीच तिची दहावी झाली होती. पहिल्याच चित्रपटात तेजस्विनीने जितेंद्र जोशीच्या हिरोइनची भूमिका साकारली होती.

4 / 5
तेजस्विनीचा 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा' हा चित्रपट चांगला गाजला. पण त्यानंतर बराच काळ तिला चांगले ऑफर्स मिळत नव्हते. 14 वर्षे माझं अयशस्वी करिअर होतं, असा खुलासा खुद्द तेजस्विनीने एका मुलाखतीत केला होता.

5 / 5
'देवमाणूस' मालिकेच्या वर्षभराआधी तेजस्विनी कामापासून पूर्णपणे लांब होती. हा संपूर्ण वेळ तिने स्वत:साठी दिला होता. नंतर बिग बॉस मराठी या शोमध्ये ती झळकली. त्यानंतर ती पुन्हा हळूहळू चित्रपट, मालिका यांमध्ये झळकू लागली.