
बाॅलिवूडचे असे बरेच कलाकार आहेत. जे चित्रपटांसोबतच इतर काही व्यवसायामधून कोट्यावधीची कमाई करतात. यामध्ये सलमान खान याच्या नावाचा देखील समावेश होतो. सलमान खान याचा कपड्यांचा ब्रॅंड असून तो त्यामधून मोठी कमाई करतो.

अजय देवगण हा देखील चित्रपटांसोबत इतर अनेक ठिकाणाहून पैसे कमावतो. अजय देवगण याने सोलर प्रोजेक्ट आणि प्रोडक्शन हाउसमध्ये पैसे लावले आहेत. त्यामधून त्याची चांगली कमाई होते.

शाहरूख खान याची आयपीएलमध्ये टीम असून त्याच्या माध्यमातून शाहरूख खान हा मोठी कमाई करतो. शाहरूख खान हा जाहिरातीमधूनही मोठी कमाई करतो.

कतरिना कैफ हिचा स्वत:चा एक ब्युटी प्रोडक्ट ब्रॅंड आहे. यामधून कतरिना कैफ ही मोठी कमाई करते. के ब्युटी असे कतरिना कैफ हिच्या ब्रॅंडचे नाव आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील चित्रपटांसोबत इतर व्यवसायामधून मोठी कमाई करताना दिसते. कपड्यांचा देखील दीपिका पादुकोण हिचा एक ब्रॅंड आहे.