Breakfast Mistakes : हेल्दी नाश्ता करणारेही या चूका करतात, त्यामुळे काय नुकसान होतं?
Healthy Breakfast Mistakes : आपल्या रोजच्या खाण्या-पिण्यामध्ये ब्रेकफास्ट महत्वाचा घटक आहे. ब्रेकफास्ट न करण ही चूक आहेच. पण त्यावेळी काही चूका केल्यास फायद्याऐवजी नुकसान होतं. हेल्दी लाइफस्टाइलशी संबंधित काही कॉमन चूका समजून घ्या.

ब्रेकफास्टकडे दुर्लक्ष करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलय. यामुळे डायबिटीजचा धोका वाढतो. पण तुम्हाला हे माहितीय का? काही लोक हेल्दी ब्रेकफास्टमध्ये सुद्धा चूका करतात. जाणून घेऊया त्या बद्दल.

सीनियर डाइटिशियन गीतिका चोपडा यांच्यानुसार, उपमा, इडली आणि पोहे तुम्ही नाश्त्यामध्ये खात असाल तर फायबर इंटेक सुद्धा ठेवा. लोक प्लेन पोहे किंवा उपमा खातात. त्यात फायबरची कमतरता असते. त्यामुळे शुगर पेशेंट्सचा त्रास वाढू शकतो.

मक्यापासून बनणारा कॉर्न फ्रेक्लस खाताना सुद्धा लोक चूक करतात. हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे. हा मार्केटमधून मागवला जातो. यात शुगर इंटेक आणि लेबल वर असलेली दुसरी माहिती सुद्धा वाचली पाहिजे.

काही ट्रेंडमध्ये फळं रिकामी पोटी खाल्ली जातात डायटिशियन गीतिका चोपडा सांगतात की, तुम्ही फळं रिकाम्या पोटी खाऊ शकता. पण आंबट फळं खाऊ नका. यात सीट्रिक एसिड असतं. जे एसिडिटी, ब्लोटिंग आणि अपचन वाढवतं.

काही लोक नाश्त्यामध्ये ज्यूस हेल्दी ऑप्शन समजून रोज पितात. शुगर पेशेंटसाठी हे धोकादायक आहे. सामान्य लोकांनी सुद्धा फळं कापून खाल्ली पाहिजेत. ज्यूस काढल्यामुळे फळांमधून फायबर वेगळा होतो.