‘या’ सोप्या टीप्सने किचनमधील कामे झटपट होतील पूर्ण, तुमचं काम होईल सहज
अनेक महिलांना काही सोप्या टीप्स माहिती नसतील, ज्यामुळे त्यांचं काम झटपट पूर्ण होईल... त्यामुळे महिलांना कामं आवरण्यासाठी देखील फार कमी वेळ लागेल... तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या महत्त्वाच्या टीप्स

आमटी जास्त खारट झाली असेल, तर त्यात हिरव्या बटाट्याचा एक छोटा तुकडा टाका. त्यामुळे मीठ शोषलं जाईल. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला फ्रिजमध्ये ठेवलेलं नारळ किसणं अवघड वाटत असेल, तर ते बाहेर काढून किसण्यापूर्वी अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा.

हिरव्या मिरच्या लवकर खराब होतात, म्हणून मिरच्यांचे देठ काढून टाका आणि त्यांना हवाबंद डब्यात किंवा फ्रिजमध्ये झाकून ठेवा. यामुळे त्या जास्त काळ ताज्या राहण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे, भात टोपाला चिकटू नये यासाठी एक उपाय आहे. भात शिजवताना चिकटू नये म्हणून, उकळत्या पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब किंवा थोडे तेल घाला.

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून, कांदा अर्धा कापून 10 मिनिटे थंड पाण्यात ठेवा किंवा चिरण्यापूर्वी फ्रिजमध्ये ठेवा. त्याचप्रमाणे, लसूण सोलणे सोपे व्हावे यासाठी, त्याच्या पाकळ्या थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवा.

लिंबू पिळण्यापूर्वी, ते जमिनीवर किंवा कटिंग बोर्डवर ठेवून हाताने चांगले दाबा. यामुळे लिंबामधून जास्त रस काढण्यास मदत होईल.