लग्नाआधी जोडीदाराला या तीन चाचण्या करायला लावाच, तिसरी चाचणी फारच महत्त्वाची, नाहीतर आयुष्यभर रडत बसण्याची येईल वेळ

लग्न करण्याआधी भावी जोडीदाराला त्याचा स्वभाव, आवड याविषयी विचारायला हवेच. परंतु लग्नाआधी या तीन चाचण्या करणे फारच महत्त्वाचे आहे. त्या न केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

| Updated on: Nov 13, 2025 | 8:23 PM
1 / 5
लग्न करण्याआधी मुलगा आणि मुलीची कुंडली जुळते का हे आवर्जुन पाहिले जाते. परंतू कुंडली जुळवण्याचा खटाटोप करण्याआधी होणाऱ्या नववधू आणि वराने तीन चाचण्या आवश्य करायला हव्यात. या चाचण्या लग्नाआधी न केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

2 / 5
लग्नाआधी  करावयाच्या या तीन चाचण्यांमध्ये पहिली चाचणी ही एसटीडीची आहे. या चाचणीतून आपल्या जोडीदाराला शरीरसंबंधांतून होणारा एखादा संसर्गजन्य आजार आहे का? याची माहिती मिळते. एचआयव्ही, हेपॅटायटीस बी, सिफिलीस आदी आजार हे लैंगिक संपर्कातून होतात. त्यामुळे लग्नाआधी एसटीडीची चाचणी करणे गरजेचे आहे.

3 / 5
दुसरी चाचणी ही जनेटिक कंम्पॅटिबिलीटीची आहे. या चाचणीमुळे भावी पती-पत्नीमध्ये एखादी जनुकीय अडचण तर नाही ना? याची माहिती मिळते. जोडीदारात जनुकीय अडचण असेल तर होणाऱ्या बाळावर एखादा अनुवांशिक आजार होण्याची शक्यता असते. ही अडचण येऊ नये यासाठी ही चाचणी करणे गरजेचे आहे.

4 / 5
तिसरी चाचणी ही फर्टिलीटी टेस्टची आहे. यातून तुमचा जोडीदार प्रजननक्षम आहे का? याची माहिती मिळते. त्यामुळे लग्न करण्याआधी ही चाचणी करणेदेखील फार गरजेचे आहे. या तिन्ही चाचण्या केल्यास लग्नानंतर भविष्यात येणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतात.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)