साध्या कारला बुलेटप्रुफ करण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्यानंतर सेलिब्रिटी मंडळी अलर्ट झाली आहे. सेलिब्रिटी जीवाच्या सुरक्षेसाठी कारच्या काचा बुलेटप्रुफ करू लागल्याचे समोर आलं आहे.

| Updated on: Oct 21, 2026 | 2:05 PM
1 / 5
टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी अनेक गोळ्या टायगरच्या कारवर झाडल्या. या घटनेनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता बॉलिवूड सेलिब्रिटींनी घरांच्या खिडक्यासहित कारला बुलेटप्रुफ काचा लावण्यास सुरुवात केली आहे.

2 / 5

भारतीय कायद्यानुसार, कोणताही नागरिक सुरक्षेच्या कारणास्तव साध्या कारच्या काचा बुलेटप्रुफ करता येऊ शकता. परंतु थेट गॅरेजमध्ये जाऊन काचा बदलू शकत नाही. त्यासाठी कारच्या रचनेत मोठे बदल करावे लागतात.

3 / 5

कारला बुलेटप्रुफ काचा बसवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यासाठी तुम्हाला स्थानिक पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता असते. तसेच त्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, गृह मंत्रालयाची देखील परवानगी लागते.

4 / 5

व्यक्तीच्या जीवाला खरंच धोका आहे का, याची माहिती घेतली जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला परवानगी मिळते. परवानगी मिळाल्यानंतर आरटीओकडून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देखील मिळवावे लागते.

5 / 5

कार बुलटेप्रुफ करण्यासाठी खर्च लाखांच्या घरात आहे. हॅचबॅक कारला 20 लाख ते 30 लाख रुपयांचा खर्च येतो. तर फॉर्च्यूनर किंवा स्कॉर्पियो सारख्या एसयूव्ही कारला 35 लाख ते 60 लाखांचा खर्च लागतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us