Tejas Crash In Dubai : भारतीय हळहळले, आपलं तेजस फायटर जेट कोसळलं, या विमानामध्ये असं काय खास आहे?

Tejas Crash In Dubai : आज भारताचं स्वदेशी बनावटीच तेजस फायटर विमान दुबई एअर शो मध्ये कोसळलं. हा सगळ्या भारतासाठी मोठा झटका आहे. कारण भविष्यातील युद्धासाठी भारताची मुख्य मदार तेजसवर असणार आहे. त्या दृष्टीने आपली तयारी सुरु आहे.

| Updated on: Nov 21, 2025 | 4:40 PM
1 / 5
आज दुबई एअर शो मध्ये एक दुर्घटना घडली. भारताचं तेजस फायटर विमान कोसळलं. हा भारतासाठी मोठा झटका आहे. कारण हे भारताचं स्वदेशी बनावटीच विमान आहे. टीव्हीवर या दुर्घटनेची दृश्य पाहताना अनेक भारतीय हळहळले. कारण तेजस भारताचा अभिमान आहे.

2 / 5
LCA तेजस स्वदेशी बनावटीचं 4.5 जनरेशनच फायटर जेट आहे. भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) हे विमान तयार केलय. सध्या इंडियन एअरफोर्सकडून या विमानाचा वापर सुरु आहे. या विमानात डेल्टा विंग आर्किटेक्चर आहे. ह्यूमन मशीन इंटरफेस कॉन्सेप्टच्या आधारावर या विमानाची निर्मिती केलीय. हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास हे विमान सक्षम आहे.

3 / 5
राफेल, सुखोई 30 एमकेआय, डसॉल्ट मिराज, या फायटर विमानांसह तेजस इंडियन एअरफोर्सच अभिन्न अंग आहे. तेजसची सध्या तीन प्रोडक्शन मॉडल आहेत. तेजस मार्क 1, मार्क 1 ए आणि ट्रेनर वेरिएंट. इंडियन एअर फोर्सने 40 तेजस मार्क 1 आणि 83 तेजस मार्क 1 ए ची ऑर्डर दिली आहे.

4 / 5
HAL ने एचएफ-24 मारूत नंतर तेजस एलसीए (लाइट कॉम्बेट एअरक्राफ्ट) भारतात बनवलेलं दुसरं फायटर विमान आहे.   ही दोन्ही विमानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केली आहेत. तेजसचा एअर फोर्सने आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.

5 / 5
लाइट कॉम्बेट एयरक्राफ्ट (एलसीए) कार्यक्रमाची सुरुवात सोवियत संघाच्या मिग-21 फायटर जेटची जागा घेण्यासाठी करण्यात आलेली. वर्ष 2003 मध्ये दिवंगत पंतप्रधान अटल बहारी वाजपेयी यांनी एलसीएला अधिकृत'तेजस' नाव दिलं.