
भीमताल, उत्तराखंड: हिमालयातील कॅम्पिंगसाठी हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. तुम्हाला येथील सुंदर मैदाने आणि हिरवळीची भुरळ पडेल. रात्रीच्या वेळी तर इथले दृष्य मनाला मोहिनी घालतात. येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एकदा तरी भीमतालला भेट ही द्यायलाच हवी.

धर्मशाला : कांगडा जिल्ह्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण हिमाचलच्या सर्वात पसंतीच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे ट्रायंड ट्रॅकद्वारे ट्रायंड शिखराच्या ट्रेकिंगचा तुम्ही आनंद घेऊ शकता. या ठिकाणी कॅम्पिंग करण्याची मजा काही वेगळीच असते.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड: हे हिमालयाच्या पायथ्याशी तब्बल 88 चौरस किमीवर पसरलेले एक मैदान आहे. हे ठिकाण धबधबे आणि मैदानांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कॅम्पिंग देखील मजेदार असते. या परिसरात निसर्गाने इतक्या मुक्तहस्ताने उधळन केली आहे की, येथील सौंद्यर्याला तोडच उरत नाही.

सांगला व्हॅली, हिमाचल : हे हिमाचलच्या प्रसिद्ध कॅम्पिंग स्थळांपैकी एक आहे. या दरीत देवदार आणि अक्रोडाची झाडे पाहयला मिळतात. जर तुम्ही कॅम्पिंगची योजना बनवत असाल तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम असे स्थळ आहे.

कुल्लू : कुल्लू हे हिमाचल प्रदेशातील सर्वात आवडते पर्यटन ठिकाण मानले जाते. येथे कॅम्पिंग व्यतिरिक्त तुम्ही रिव्हर राफ्टिंग देखील करू शकता. विशेष म्हणजे हिवाळ्यातही येथे कॅम्पिंग करता येते.