‘तुला पाहते रे’ फेम गायत्रीच्या हातावर रंगली श्रीकांतच्या नावाची मेहंदी

अभिनेत्री गायत्री दातारच्या घरी सनई चौघडे वाजणार असून नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गायत्रीचा होणारा पती कोण आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Apr 26, 2026 | 8:56 AM
1 / 6
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी कलाविश्वातील काही कलाकारसुद्धा उपस्थित होते. गायत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेहंदीचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 6
या कार्यक्रमात गायत्री आणि आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने मेहंदीच्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

3 / 6
माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली, असं म्हणत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गायत्रीने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. यावेळी तिच्या हातात साखरपुड्याची अंगठीसुद्धा पहायला मिळाली होती.

4 / 6
गायत्रीच्या होणाऱ्या पतीचं नाव श्रीकांत चवरे असं आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केल्याचं इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलं आहे. त्याचसोबत तो ड्रोन फोटोग्राफरसुद्धा आहे. श्रीकांतला फिरण्याची आणि फोटोग्राफीची खूप आवड आहे.

5 / 6
गायत्री तिच्या लग्नाचे विविध अपडेट्स इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत आहे. लग्नाची शॉपिंग कुठून केली, दागिने कुठून घेतल, नेल आर्ट कोणतं केलं, या सर्वांची झलक तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दाखवली आहे.

6 / 6
गायत्री दातारने 'तुला पाहते रे' या मालिकेतून पदार्पण केलं. यामध्ये तिने सुबोध भावेसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने 'अबीर गुलाल' या मालिकेती भूमिका साकारली आहे.

Follow Us