Urmila Kanetkar : कर्माची वाट बघू नका, जागीच तोंड फोडा…उर्मिला कानेटकरचा रोख कोणाकडे?

Urmila Kantekar Post: मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये ती नेमकी काय म्हणाली आहे ते पाहा...

| Updated on: Oct 22, 2026 | 2:37 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानेटकर सध्या चर्चेत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर तिला तिचे सोशल मीडीया हँडल बदलून मिळाल्याने ती प्रचंड आंनदी होती. अशी तिने पोस्ट करत माहिती दिली. आता तिने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे ज्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.

2 / 5

उर्मिला कानेटकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील तिचे नाव बदलल्याचे पोस्टद्वारे माहिती दिली होती. आधी ती उर्मिला कोठारे असं नावा लावायची आता ती उर्मिला कानेटकर असं नाव लावते.

3 / 5

अशातच उर्मिलाने शेअर केलेल्या पोस्टची आता चर्चा रंगली आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक छोटी मुलगी बोलत असल्याचे दिसत आहे.

4 / 5

या पोस्टमध्ये ती लहान मुलगी बोलतेय की, कर्मा वगेरे काही नसतं, जागच्या जागीच सगळं सुनवून टाका मित्रांनो, आणि जर संधी मिळाली ना तर एक दोन कानाखाली मारा, कर्माची वाट बघत बसू नका."

5 / 5

व्हिडिओ स्टोरीला शेअर करत तिने त्यावर Don't Wait For Karma मित्रांनो असं लिहिलं आहे. आता तिच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. उर्मिलाचा रोख नेमका कोणाकडे आहे असा सवाल आता चाहत्यांना पडला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us