मद्यासोबतच या वस्तूंवर मोठा टॅरिफ, अमेरिकेचा पुन्हा दणका, कॅनडाला..
अमेरिका गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांवर मोठा टॅरिफ आकारत आहे. त्यातच आता कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेने थेट एक यादीच जाहीर केली, ज्यात कोणकोणत्या वस्तूंवर टॅरिफ लावला जाणार आहे, हे सांगितले.

अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले आहेत. अमेरिकेने कॅनडावर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफला कॅनडानेही थेट उत्तर दिले. पुन्हा एकदा अमेरिकेने कॅनडाला मोठा दणका दिला.
थेट व्हाईट हाऊसने पाच नवीन कार्यकारी आदेश जारी केले. या आदेशांनुसार, कॅनडातीन आयात केल्या जाणाऱ्या काही वस्तूंवर झेय बंदी घालण्यात आली. कॅनेडियन उत्पादनांवर थेट 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सीबीसीच्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासन 50 टक्के आयात शुल्क लागू होणाऱ्या वस्तूंच्या यादीत गाद्या आणि मोटरबोट्ससह इतर कॅनेडियन उत्पादनांचाही समावेश करत आहे.
हे निर्बंध या महिन्याच्या अखेरीस लागू होतील. ज्या दिवशी कॅनडाने अब्जावधी डॉलर्सच्या अमेरिकन आयातीवर शुल्क लागू केले, त्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच कॅनडासोबत अमेरिकेचा मोठा टॅरिफ वॉर सुरू असल्याचे सध्या बघायला मिळतंय. मद्य, बाईक यासारख्या गोष्टींवरही टॅरिफ लागू केला जात आहे.