केसांच्या ‘या’ समस्या दूर करण्यासाठी नारळाचे तेल ठरते सर्वोत्तम

| Updated on: Dec 13, 2022 | 11:45 AM
1 / 5
मऊ, मुलायम, घनदाट आणि निरोगी केस असणं हे प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी केसांची योग्य काळजी घेऊन त्यांना नियमितपणे तेल लावणे आवश्यक असतं. तेलाने केसांना मसाज केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. त्यासाठी तुम्ही नारळाचे तेल वापरू शकता, त्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात. केसांसाठी नारळाचे तेल वापरल्याने अनेक फायदे मिळतात.

2 / 5
खोबरेल तेल अथवा नारळाचे तेल हे केसगळती कमी करण्यास मदत करते. त्यात बुरशीविरोधी गुणधर्म असतात. खोबरेल तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक व अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. नारळाच्या तेलामुळे केसांचे पोषण होते.  या तेलामुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते व केसांची मुळं मजबूत होतात.

3 / 5
खोबरेल तेलाचा वापर केल्याने कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती मिळते. हे तेल लावल्याने स्काल्पला सुटणारी खाज कमी होते. तसेच हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकते.

4 / 5
खोबरेल तेल हे केसांच्या वाढीस मदत करते. खोबरेल तेलाने केसांना नियमितपणे मसाज केल्यास त्यांची वेगाने वाढ होते. तसेच केसगळती व टक्कल पडण्याची समस्या दूर होते.

5 / 5
तुमचे केस खराब झाले असतील तर खोबरेल तेलाने नियमितपणे केसांना मालिश करावे. त्यासाठी केस धुण्यापूर्वी आदल्या रात्री किंवा किमान 3 ते 4 तास आधी केसांना खोबरेल तेल लावू हलक्या हाताने मालिश करावे. तेल पूर्णपणे जिरल्यानंतर सौम्य शांपूने केस धुवावेत. खोबरेल तेलाच्या नियमित वापरामुळे केसांचे आरोग्य सुधारते, त्यांची मुळ मजबूत होतात व त्यांची वाढही चांगली होते.