Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
1 / 5

दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात अर्धशतक झळकावून वैभव सूर्यवंशीने आणखी एक विक्रम रचला. दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
2 / 5
वयाच्या १५ वर्षे आणि १५७ दिवसांत ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम लक्ष्मण सिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी १९६९ मध्ये वयाच्या १६ वर्षे आणि २३ दिवसांत अर्धशतक झळकावले होते.
3 / 5
बंगळूरमधील सेंट्रल ऑफ एक्सलन्स मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ईस्ट झोनकडून सलामीला खेळताना वैभवने सेंट्रल झोनविरुद्ध ४२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.
4 / 5
वैभवची शतकी खेळी जरी पूर्ण झाली नसली तरीही वैभवने मागील ५७ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
5 / 5
वैभव ९२ धावांची खेळी करुन बाद झाला, वैभवला यावेळी आपले शतक पूर्ण करता आले नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us