
व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रोड्रिगेज यांची निवड करण्यात आली आहे. निकोलस मादुरो यांच्या त्या जवळच्या मानल्या जात आहेत. त्या देखील मादुरो यांच्या सारख्याचे पुट्टापार्थीचे सत्य साईबाबांच्या भक्त आहेत. त्या त्यांना फॉलो करतात.महत्वाचे निर्णय बाबांच्या स्मृतींची आठवण काढून घेतात.

डेल्सी रोड्रिगेज यांचे साई प्रेम भारत प्रवासात स्वच्छपणे दिसले. त्यांनी २०२३ आणि अलिकडेच ऑक्टोबर २०२४ मध्ये आंध्रप्रदेश येथील पुट्टापार्थीचा दौरा केला होता. त्यांना सत्य साईबाबांच्या समाधीवर माथा टेकला होता.या दौऱ्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस हे दाम्पत्य देखील परम भक्त होते. ते २००५ मध्ये पुट्टापार्थीला आले होते. सत्यसाईबाबांचा त्यांनी आशीवार्द घेतला होता. दोघांचे या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

असे म्हटले जाते की मादुरो यांच्या बेडरुम आणि राष्ट्राध्यक्ष कार्यालयात महान क्रांतीकारी सायमन बोलिवर यांच्या सोबत सत्य साईबाबांची भव्य तस्वीर लावली होती. मादुरो देखील त्यांच्या तसबीराला नमन केल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेत नव्हते.

तज्ज्ञांच्या मते डेल्सी रोड्रिगेज त्यांच्या संकटाच्या घडीत बाबांच्या मानवीय मूल्ये आणि विचारांकडून प्रेरणा घेतात. त्यांनी पुट्टापार्थी दौऱ्या दरम्यान तेथील शांतता आणि उर्जेचा त्यांनी विशेष उल्लेख केला होता.

मादुरो आणि डेल्सी यांच्या कार्यकाळात व्हेनेझुएला येथे सत्य साई संघटना वेगाने फैलवत आहे. तेथे अनेक शाळा आणि आध्यात्मिक केंदांना सरकारचे समर्थन आहे.

२०११ मध्ये जेव्हा सत्य साईबाबांचे निधन झाले होते. तेव्हा व्हेनेझुएलाच्या संसदेने अधिकृतपणे शोक प्रस्ताव पारित केला होता. आणि एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. मादुरो देखील स्वत: सत्यसाईबाबा हयात असताना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते.