Photo | हॉट विद्या बालनचं मोहक रूप व्हायरल, घरातच फोटोशूट करुन चाहत्यांना म्हणाली…

विद्या बालनचे नवे फोटो समोर आले आहेत. ती या फोटोमध्ये चक्क पाश्चिमात्त्य कपड्यामंध्ये दिसत आहे. (vidya balan latest viral photo)

| Updated on: Apr 02, 2021 | 12:11 AM
1 / 3
आपल्या मादक आणि मोहक अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन ही नेहमीच चर्चेत राहते. ती फक्त भारतीय कपड्यांमध्येच छान दिसते. विद्या बालनला पाश्चिमात्य कपडे चांगले दिसत नाहीत, असा एक प्रघात लोकांमध्ये आहे. याच मुद्द्याला घेऊन मागील काही दिवसांमध्ये तिने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये अशा प्रकारची समज असणाऱ्यांनी तिने चांगलेच उत्तर दिले होते. याच पार्श्वभूमीवर विद्या बालनचे आता नवे फोटो समोर आले आहेत. ती या फोटोमध्ये चक्क पाश्चिमात्त्य कपड्यामंध्ये दिसत आहे. पारंपरिक कपड्यांमध्येच विद्या बालन छान दिसते असा समज असणाऱ्यांसाठी विद्याचे हे फोटो म्हणचे चांगलीच चपराक असल्याचे म्हटले जात आहे.

2 / 3
विद्या बालन भारतीय तसेच पाश्चिमात्य कपड्यांमध्येसुद्धा तितकीच गोड दिसते याची साक्ष म्हणजे हे फोटो आहेत. विद्याचे सौंदर्य आणि नजाकत या फोटोंमध्ये ओसंडून वाहते आहे. फोटमध्ये दिसतंय त्याप्रमाणे विद्याने हिरव्या रंगाची छटा असलेला क्विन गाऊन घातला आहे. तिच्या देहयष्टीला साजेसा हा गाऊन तिच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर घालतो आहे.

3 / 3
क्वीन गाऊनमध्ये फोटोशूट केल्यानंतर विद्या बालनने हे फोटो शोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने आपल्या फोटोंना सध्याच्या आरोग्यविषयक समस्येला घेऊन समर्पक असं कॅप्शन दिलं आहे. तिने चांगले कपडे घालून घरातच बसा. बाहेर निघू नका असं कॅप्शनमध्ये लिहलं आहे. विद्या बालन ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने हे फोटो अपलोड करताच ते काही क्षणांत समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. विद्या बालन आगामी काळात आपल्याला शेरनी या तिच्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल.