Tea Health : रोज 4-5 कप चहा पिताय, वेळीच थांबा नाहीतर…वाचा शरीरावर काय होईल परिणाम!

चहा प्रत्येकालाच आवडतो. परंतु आपण दिवसभरात किती चहा पितोय, हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यावर तुमच्या शरीरावर वाईट परिणाम पडू शकतो.

| Updated on: Mar 02, 2026 | 12:49 AM
1 / 5
चहा कुणाला आवडत नाही. जवळजवळ प्रत्येकजण चहाप्रेमी आहे. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पितोच. परंतु कधीकधी चहा पिण्याची हीच सवय तुम्हाला फार संकटात टाकू शकते. प्रमाणापेक्षा जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

चहा कुणाला आवडत नाही. जवळजवळ प्रत्येकजण चहाप्रेमी आहे. आपण दिवसातून दोन ते तीन वेळा चहा पितोच. परंतु कधीकधी चहा पिण्याची हीच सवय तुम्हाला फार संकटात टाकू शकते. प्रमाणापेक्षा जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

2 / 5

प्रमाणात चहाचे पिल्यास तुम्हाला ताजेतवाणे वाटू शकते. चहामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे आळस गेल्यासारखे वाटते. पण काही लोक असे असतात की त्यांना प्रत्येक दोन ते तीस तासाला चहा लागतो. दिवसभरात किती चहा प्यावा याचे निश्चित प्रमाण नाही.

3 / 5

परंतु दिवसभरात शरीरात 200 ते 300 मिली ग्रॅमपेक्षा जास्त कॅफीन जायला नको. तुम्ही दिवसभरात पाच ते सहा कप चहा घेत असल्यास वेळीच सावध होणे गरजेचे आहे. प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यास तुमच्या शरीरातील कॅफीन वाढते. यामुळे हृदयाची धडधड वाढणे, झोप न लागणे अशी समस्या येऊ शकते.

4 / 5

प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे अॅसिडीटी, पोट खराब होणे, जळजळ होणे असाही त्रास होऊ शकतो. जास्त चहा घेतल्यामुळे अॅनेमियाचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे चहा पिताना आपण किती पितोय याची काळजी घेणे गरजेचे आहे.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us