तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!

आजकाल कोणताही ऋतू असू देत घरात डास पाहायला मिळतात. घरात एकदा डास झाले की ते सहजासहजी घरातून बाहेर पडत नाहीत. डासांचा नायनाट व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. परंतु तरीदेखील डास काही जात नाहीत.

| Updated on: Apr 12, 2026 | 12:59 AM
1 / 5
आजकाल कोणताही ऋतू असू देत घरात मच्छर पाहायला मिळतात. घरात एकदा मच्छर झाले की ते सहजासहजी घरातून बाहेर पडत नाहीत. मच्छरांचा नायनाट व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. परंतु तरीदेखील मच्छर काही जात नाहीत. त्यामुळेच घरात मच्छर होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊ या...

2 / 5

तुमच्या घरात कुठेही जमा झालेले पाणी असेल तर ते तत्काळ फेकून द्या. कारण जमा झालेले पाणी, पाण्याच्या डबक्यांमुळे मच्छर होतात. घारातील कुलरमध्ये टाकलेल्या पाण्यामुळेही मच्छर होतात. त्यामुळे कुलरही वेळेवर स्वच्छ करा.

3 / 5

घरातील कपड्यांमुळेही खूप मच्छर होतात. तुम्ही बाहेरून आले की घाम आलेले कपडे तसेच ठेवता. त्यामुळे तुमच्या खोलीला एका प्रकारे आर्द्रता येते. ही आर्द्रता डासांच्या वाढीस पुरक असते. त्यामुळे घाण झालेले कपडे लगेच धुवून टाकावेत.

4 / 5

घरातील कोपऱ्यात सर्वाधिक डास सापडतात. घरातील कोपऱ्यांची साफसफाई व्यवस्थित न केल्यास तेथे डास होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील कोपऱ्यांत अडगळीचे सामान टाकू नये. सर्व घर व्यवस्थित स्वच्छ करावे.

5 / 5

घरातील डस्टबीन हेदेखील डासांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे डस्टबीनमध्ये कचरा साचू देऊ नये. तसेच डस्टबीनचे झाकण लावलेले असावे. कचरा साचल्यास तो लगेच फेकून द्यावा. डस्टबीन नियमितपणे स्वच्छ करावी. यामुळे घरात डास होणार नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us