Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घ्या सविस्तर!
अक्षय तृतियेला दान करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतियाच्या दिवशी परशुराम जयंतीदेखील साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी तसेच भवान विष्णू यांचीही पूजा केली जाते.

हिंदू धर्मात अक्षय तृतियेचा दिवस खूपच पवित्र आणि शुभ मानला जातो. अक्षय तृतियेचा दिवस हा सोने खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी केली तर धनात वाढ होते, असे मानले जाते.

यावेळी 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतिया आहे. त्यामुळे या दिवशी सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त कोणता आहे, ते जाणून घेऊ या. या दिवशी सोने खरेदी करण्याचा मुहूर्त 19 एप्रिल रोजी सकाळी 10.49 वाजता सुरू होईल.

त्यानंतर तुम्हाला सोने 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 06.18 वाजेपर्यंत खरेदी करता येईल. पंचांगानुसार 19 एप्रिल रोजी अक्षय तृतियेनिमित्त पूजा मुहूर्त सकाळी 10.49 ते दुपारी 12.38 वाजेपर्यंत असे.

अक्षय तृतियेनिमित्त पूजेसाठी साधारण 1 तास 49 मिनिटांचा वेळ असेल. अक्षय तृतियेचा दिवस हा वर्षभरातील शुभ तिथीमधील एक तिथी असते. या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना खूप महत्त्व असते.

अक्षय तृतियेला दान करणे शुभ मानले जाते. अक्षय तृतियाच्या दिवशी परशुराम जयंतीदेखील साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी तसेच भवान विष्णू यांचीही पूजा केली जाते. Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.