मुकेश अंबानी यांच्या अँटिलियातील सफाई कर्मचाऱ्यांचा पगार किती? आकडा ऐकाल तर डोळे विस्फारतील…

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानातील सफाई कामगारांना कॉर्पोरेट स्टाईल वेतन आणि सरकारी नोकरीसारख्या सुविधा मिळतात. मात्र, अँटिलिया निवासस्थानातील कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जातो याची माहिती तुम्हाला माहिती आहे का ?

| Updated on: Aug 02, 2026 | 9:05 PM
1 / 6
दक्षिण मुंबईतील अँटिलिया  निवासस्थान हे त्याच्या भव्यतेसाठी जगभरात ओळखले जाते. ही तब्बल २७ मजली इमारत केवळ सिमेंट- विटा आणि दगडांनी बनलेली वास्तू नसून अभियांत्रिकीचा एक अद्भूत नमुना मानली जाते. (Photo source | Getty Images)

2 / 6
अँटिलिया हाऊसचे फोटो पाहनाता अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या इमारतीची देखभाल कशी आणि किती लोक करत असतात? देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो आणि त्यांना कोणते फायदे मिळतात याची तुम्हाला कल्पना आहे का ? (Photo source | Getty Images)

3 / 6
उद्योजक मुकेश अंबानी यांचे निवासस्थान एखाद्या पंचतारांकित हॉटेल किंवा कॉर्पोरेट मुख्यालयापेक्षा सरस आहे. या २७ मजली इमारतीचा कानाकोपरा चकचकीत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसभर सुमारे ६०० कर्मचारी रात्रंदिवस काम करीत असतात. (Photo source | Getty Images)

4 / 6
 अँटिलिया हाऊसच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा रक्षक, वैयक्तिक सहाय्यक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ बनवणारे शेफ, इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि एसी टेक्निशियन यांचाही समावेश आहे. अंबानी कुटुंबाला कोणतीही कमतरता भासू नये अशा प्रकारे या घराचे व्यवस्थापन केले जाते.  हे कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळे घराची २४ तास देखभाल केली जाते.(Photo source | Getty Images)

5 / 6
सूत्रांनुसार,उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कॉर्पोरेट जगतातील अनेक चांगल्या पदांवरील लोकांपेक्षा कितीतरी जास्त आहेत. (Photo source | Getty Images)

6 / 6
 मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया'मध्ये सुमारे ६०० कर्मचारी काम करतात. स्वच्छता कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना दरमहा १.५ ते २ लाख रुपये पगार मिळतो. एवढेच नाही, तर अंबानी कुटुंब आपल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा, विमा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासारखे लाभही पुरवते. ( डिस्क्लेमर : या बातमीत  दिलेली माहिती समाजमाध्यमातील बातम्यांवर आधारित आहे. टीव्ही९ मराठी कोणत्याही माहितीला दुजोरा देत नाही. ) (Photo source | Getty Images)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us