मोदी, ट्रम्प ते पुतिन… जगातील शक्तिशाली नेत्यांना जेवणात काय आवडतं? उत्तर थक्क करणारं!

जागतिक नेत्यांच्या खाद्यपसंती वैविध्यपूर्ण आहेत. नरेंद्र मोदींना पारंपरिक गुजराती पदार्थ आवडतात, तर डोनाल्ड ट्रम्प फास्ट फूडला पसंती देतात. जगातील इतरदार नेत्यांना जेवणामध्ये सर्वात जास्त काय आवडतं, चला जाणून घेऊया..

| Updated on: Oct 21, 2026 | 7:15 PM
1 / 5
जगातील महासत्तांचे नेतृत्व करणारे राष्ट्रप्रमुख जागतिक मंचावर कठोर निर्णय घेताना दिसतात. मात्र, राजकारणापलीकडे त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीही तितक्याच रंजक आहेत. आलिशान मेजवान्यांपासून ते साध्या घरगुती जेवणापर्यंत या नेत्यांच्या खाद्यपसंती वेगवेगळ्या आहेत. कोणाला पारंपरिक पदार्थ आवडतात, तर कोणाला फास्ट फूडची भुरळ आहे. चला, जाणून घेऊया जगातील विविध राष्ट्रप्रमुखांच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांविषयी. ( all Photos : Social Media)

जगातील महासत्तांचे नेतृत्व करणारे राष्ट्रप्रमुख जागतिक मंचावर कठोर निर्णय घेताना दिसतात. मात्र, राजकारणापलीकडे त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीही तितक्याच रंजक आहेत. आलिशान मेजवान्यांपासून ते साध्या घरगुती जेवणापर्यंत या नेत्यांच्या खाद्यपसंती वेगवेगळ्या आहेत. कोणाला पारंपरिक पदार्थ आवडतात, तर कोणाला फास्ट फूडची भुरळ आहे. चला, जाणून घेऊया जगातील विविध राष्ट्रप्रमुखांच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांविषयी. ( all Photos : Social Media)

2 / 5

नरेंद्र मोदी : गुजराती पदार्थ आणि साध्या जेवणाला पसंती - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या शिस्तबद्ध दिनचर्येसाठी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या आहारात शाकाहारी आणि पारंपरिक भारतीय पदार्थांना महत्त्व असल्याचे अनेकदा सांगितलं जातं. गुजराती खाद्यसंस्कृतीशी त्यांचं विशेष नाते असून, खिचडीसारख्या साध्या पदार्थांपासून ढोकळ्यासारख्या पारंपरिक पदार्थांपर्यंत विविध खाद्यपदार्थांची चर्चा त्यांच्या आहाराच्या संदर्भात होते. गुजराती न्याहारी म्हटली की खमन ढोकळा, फाफडा आणि जलेबी या पदार्थांची नावे आवर्जून घेतली जातात. याशिवाय, सहजनाच्या शेंगांपासून तयार केलेले पदार्थ आणि सहजनाच्या पानांचे पौष्टिक गुणधर्म यांनाही विशेष महत्त्व दिलं जातं. साधेपणा, पारंपरिक चव आणि शाकाहारी आहार ही मोदींच्या खाद्यपसंतीची वैशिष्ट्ये मानली जातात.

3 / 5

डोनाल्ड ट्रम्प : बर्गर, फ्राइज आणि डाएट कोकची आवड - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाद्यपसंतीची चर्चा झाली की सर्वप्रथम फास्ट फूडचा उल्लेख केला जातो. आलिशान हॉटेल्स आणि महागड्या मेजवान्यांपेक्षा मॅकडोनाल्ड्ससारख्या लोकप्रिय फास्ट फूड ब्रँडचे बर्गर, फ्रेंच फ्राइज आणि चिकन पदार्थ त्यांना अधिक आवडत असल्याचे अनेक वृत्तांतांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. निवडणूक प्रचारादरम्यानही ट्रम्प हे अनकेदा बर्गर खाताना दिसले होते. त्यांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये गोड पदार्थांचाही समावेश होतो. चॉकलेट केक आणि व्हॅनिला आइस्क्रीम हे त्यांच्या खाद्यपसंतीशी संबंधित चर्चेतील पदार्थ आहेत. याशिवाय, डाएट कोक पिण्याची त्यांची सवयही अनेकदा चर्चेत असते.

4 / 5

व्लादिमीर पुतिन : शिस्तबद्ध आहार आणि पिस्ता आइस्क्रीमची चर्चा - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या आहाराबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतांमध्ये दलिया, मध, ट्वोरोग या रशियन कॉटेज चीजसदृश पदार्थाचा तसेच मासे आणि सॅलडसारख्या पदार्थांचा उल्लेख आढळतो. मात्र, त्यांच्या वैयक्तिक खाद्यपसंतीविषयीची सर्व माहिती अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नाही. पिस्ता आइस्क्रीम हा त्यांच्या आवडीचा पदार्थ असल्याचा उल्लेखही विविध माध्यमांमध्ये केला गेला आहे.

5 / 5

शी जिनपिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या खाद्यपसंतीविषयी बोलताना पारंपरिक चिनी पदार्थांचा उल्लेख केला जातो. त्यांना चीनी स्टीम्ड बन म्हणजे बाओजी आणि चिनी डंपलिंग्स हे चीनच्या लोकप्रिय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचे पदार्थ खायला आवडतात. बाओजीमध्ये मांस, भाज्या किंवा गोड सारण भरले जाऊ शकते. त्याशिवाय त्यांना पारंपरिक चीनी डंपलिंग्स देखील खूप आवडतात. परदेशी दौऱ्यांवरही ते आपला शेफ सोबत ठेवतात जेणेकरुन त्यांना त्यांच्या आवडत्या पारंपरिक चवीचा अनुभव मिळू शकेल. मात्र, 2015 साली ब्रिटनच्या दौऱ्यात त्यांना तिथले प्रसिद्ध स्ट्रीट फूड फिश अँड चिप्स देखील खूप आवडलं होतं, ज्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us