GK : अमेरिकेला कोणत्या देशांनी वेढलेले आहे? भारतापासून किती दूर?
USA : अमेरिका हा असा देश आहे जो संपूर्ण जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहे. जगातील बाजारपेठांवरही नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असतो. हा देश कोणत्या देशांनी वेढलेला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
1 / 5

उत्तर सीमा : युनायटेड स्टेट्सच्या उत्तरेला कॅनडा हा देश आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील ही सीमा जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय भू-सीमा मानली जाते.
2 / 5
दक्षिण सीमा : अमेरिकेच्या दक्षिण दिशेला मेक्सिको हा देश आहे. या सीमेचा मोठा भाग रिओ ग्रांदे (Rio Grande) नदीने व्यापलेला आहे.
3 / 5
समुद्र सीमा : अमेरिकेच्या पूर्वेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला पॅसिफिक महासागर आणि दक्षिणेला गल्फ ऑफ मेक्सिको आहे.
4 / 5
सागरी शेजारी : मुख्य जमिनीव्यतिरिक्त अलास्का राज्यामुळे अमेरिकेची सागरी सीमा रशियाशी जोडली गेली आहे, तर फ्लोरिडा राज्याजवळून बहामास आणि क्युबा हे देश सागरी सीमेने जवळ आहेत.
5 / 5
भारतापासूनचे हवाई अंतर : भारत आणि अमेरिका यांच्यातील हवाई अंतर साधारणपणे 13500 ते 14000 किलोमीटर आहे. हे अंतर तुम्ही कोणत्या शहरातून प्रवास करत आहात यावर अवलंबून असते.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us