Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?
Egg Production India : अंडी हा भारतीयांच्या आहारातील महत्वाचा घटक आहे. भारतात प्रोटीन युक्त आहाराबद्दल मोठ्या प्रमाणाच जागरुकता आलीय. भारत जगात अंडी उत्पादनात कितव्या स्थानावर आहे? भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक अंडी उत्पादन चालतं, जाणून घ्या.

अंड्याच्या उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. जगातील सर्वाधिक अंड्यांची निर्यात करणाऱ्या देशात चीन पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. भारतातील अनेक राज्य अंडी उत्पादनासाठी ओळखली जातात. भारतातील सर्वाधिक अंडी उत्पादन करणारं राज्य कोणतं? जाणून घ्याय

आंध्र प्रदेश हे देशातील सर्वाधिक अंडी उत्पादक राज्य आहे. आंध्र प्रदेशात मॉर्डन फार्मिंग टेक्निक आणि कॉर्शियल पॉल्टी फार्म्समुळे आंध्र प्रदेश अंडी उत्पादनात देशातील नंबर एक राज्य आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यात सर्वाधिक प्रोडक्शन होतं.

आंध्र प्रदेशनंतर देशात अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य म्हणजे तामिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल. या राज्यांनी आपल्या इथे पॉल्ट्रीचं चांगलं नेटवर्क विकसित केलं आहे. सरकारी योजना आणि खासगी गुंतवणूकीने पोल्ट्री उद्योगाल मजबूत बनवलय.

जगभरात अंडी उत्पादनात चीन नंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. जगभरातील बाजारात चीन आणि भारताच्या अंड्यांना भरपूर मागणी आहे. भारतात पॉल्ट्री उद्योगात झालेल्या बदलांमुळे भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतात प्रोटीन युक्त आहाराबद्दल मोठ्या प्रमाणाच जागरुकता आलीय. संपूर्ण भारतात अंड्याची विक्री वाढली आहे. शाळा आणि सरकारी योजनांमध्ये सुद्धा चांगल्या पोषक तत्वांसाठी अंडी खाण्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच अंड्यांची मागणी वाढली आहे.